जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / अब्दुल सत्तारांचा नवा प्रताप, 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्याच विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला केली शिवीगाळ

अब्दुल सत्तारांचा नवा प्रताप, 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्याच विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला केली शिवीगाळ

अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 ऑक्टोबर : शिंदे सरकारला 100 दिवस साजरा करत आहे. पण, दुसरीकडे शिंदे सरकारमध्ये नेमकं चाललंय काय, असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांच्याच विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. शिवसेनेसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. आता नवं चिन्ह मिळवण्यासाठी शिवसेना आणि  एकनाथ शिंदे गटाकडून जोरबैठका सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व मंत्री आणि नेत्यांना वर्षा बंगल्यावर बैठकीसाठी बोलावले होते. या बैठकीला कॅबिनेटचे सर्व मंत्री हजर होते. (सं कटकाळी राज ठाकरे मोठ्या भावाची साथ देणार? एका ट्विटने चर्चांना उधाण ) मात्र, या बैठकीमध्ये  कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. बैठकीतच अब्दुल सत्तार यांनी आपलं काम केलं नसल्याचा राग ठेवत OSD यांना शिवीगाळ केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोरच हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिंदे यांनी सत्तार यांची समजूत काढली. पण, रागाच्या भरात सत्तार हे बैठकीतून निघून गेले. या घटनेमुळे वर्षा बंगल्यावर काही काळ तणावाचे वातावरण होते. ( ‘56 वर्षात कोणालाही जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं’, सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा ‘बाण’ ) दरम्यान,  ठाकरे गटाने पक्षासाठी तीन नावांचा आणि तीन चिन्हांचा प्राधान्यक्रमानुसार पर्याय निवडणूक आयोगासमोर सादर केला आहे. तर, शिंदे गटाचीही रविवारी रात्री बैठक झाली असून यात निवडणूक चिन्हासाठी तलवार, तुतारी आणि गदा या चिन्हांचा विचार सुरू असल्याचं समोर आलं आहे. अशात आता दोन्ही गटांना कोणतं चिन्ह आणि नाव मिळणार याचा फैसला निवडणूक आयोग आज करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात