Air Strike नंतर LoC वर पाकिस्तानकडून गोळीबार, 4 जवान जखमी

भारताने केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 09:37 PM IST

Air Strike नंतर LoC वर पाकिस्तानकडून गोळीबार, 4 जवान जखमी

जम्मू काश्मीर, 26 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरच्या अखनूर इथे केरी भागात पाक सैन्याने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यामध्ये भारताचे 4 जवान जखमी झाले आहे. या हल्ल्याला भारतीय लष्करानेदेखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. सीमारेषवर अजूनही मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे.

भारताने केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केला आहे. राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. कृष्णा घाटीमध्येही संध्याकाळी साडेपाच वाजता गोळीबार करण्यात आला.

भारताच्या हल्ल्याला पाकिस्तान तेवढ्याच तीव्रतेने प्रत्युत्तर देईल, असं पाकिस्ताने म्हटलं आहे. याआधी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महम्मद कुरेशी यांनी, पाकिस्तानने भारताचा हवाई हल्ल्याचा दावा फेटाळून लावला.

पाकिस्तानच्या हवाई दलाने भारताच्या हल्ल्याला उशिरा प्रतिकार केला, या वृत्ताचाही त्यांनी इन्कार केला. पाकिस्तानची लढाऊ विमानं उड्डाणासाठी सज्ज होती, असं त्यांचं म्हणणं होतं.

पाकिस्तानवर युद्धाचे ढग जमू लागलेत आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आमच्या भूमीचा एक एक इंच राखण्याची आम्ही शर्थ करू, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...

पुलवामा ते बालाकोट गेल्या 13 दिवसांमध्ये नेमकं काय झालं?

या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या सदस्यांची बैठक घेतली आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी करण्याचे आदेश दिले.

पाकिस्तानमधल्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानच्या संसदेचं खास अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाकिस्तानने जगभरातल्या प्रसारमाध्यमांना बालाकोटच्या जागी भेट देण्याचं आवाहन केलं आहे. भारतातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हवाई दलाने हा हल्ला केला, असंही पाकिस्तानचं म्हणणं आहे.


IndiaStrikeBack : 'वंदे मातरम'च्या जयघोषानं दणाणलं भोसला मिल्ट्री स्कूल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 09:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...