जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पत्रकारिता सोडून तरुणाने सुरू केला पोल्ट्री व्यवसाय, आता लोकांना देतो रोजगार

पत्रकारिता सोडून तरुणाने सुरू केला पोल्ट्री व्यवसाय, आता लोकांना देतो रोजगार

पत्रकारिता सोडून तरुणाने सुरू केला पोल्ट्री व्यवसाय, आता लोकांना देतो रोजगार

मेहनत आणि कठोर परिश्रमामुळे तो मासे आणि कुक्कुटपालन करून लाखो रुपये कमवत आहे.

  • -MIN READ Trending Desk Bihar
  • Last Updated :

    कैमूर: कठोर परिश्रम आणि मेहनतीने मनापासून एखादं काम केलं की सर्वकाही शक्य होतं, असं म्हटलं जातं. जोपर्यंत एखादी व्यक्ती व्यवसायात रिस्क घेत नाही, तोपर्यंत ती यशस्वी होऊ शकत नाही. मेहनत आणि कठोर परिश्रमामुळे तो मासे आणि कुक्कुटपालन करून लाखो रुपये कमवत आहे. बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील दुर्गावती पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या कबिलासपूर गावातील तरुणाची सध्या चर्चा होत आहे. यासोबतच ते लोकांना रोजगारही देत आहेत. या तरुणाचं नाव स्कंद कुमार सिंह असून, तो आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला पंख देताना दिसत आहे. आत्मनिर्भर होऊन ते कुक्कुटपालन व मत्स्यपालनातून लाखो रुपये कमवत आहेत. ते लोकांना कामही देत आहेत. एक काळ असा होता जेंव्हा ते दुसऱ्यांसोबत काम करायचे. आज ते स्वतः लोकांना नोकऱ्या देत आहेत. बेरोजगारीच्या या काळात लोक नोकऱ्या शोधत आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे बरेच जण स्वयंरोजगाराकडे वळत आहेत. बऱ्याच जणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण ते रिस्क घ्यायला घाबरतात. दुसरीकडे कबिलासपूरच्या स्कंद कुमार सिंह यांनी पत्रकारितेची नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला आणि आता ते यशस्वी उद्योजक आहेत. स्कंद कुमार सिंह यांनी सांगितलं की, कोरोनाच्या काळात लॉकडाउन लागलं तेव्हा ते त्यांच्या मूळ गावी परतले होते. नोकरी मिळण्याची शक्यताही खूपच कमी होती. ते म्हणाले, ‘ही 2019-2020 ची गोष्ट आहे, मग गावातच राहून काहीतरी करण्याचा विचार केला.

    News18लोकमत
    News18लोकमत

    वडिलांनी या विचाराकडे माझं लक्ष वेधलं. त्यानंतर मत्स्यपालन आणि कुक्कुटपालनाचा विचार मनात आला. पण, मनातून एक भीतीही होती की व्यवसाय बंद झाला तर काय करणार? पण मी रिस्क घेतली. सुरुवातीला कमी खर्चात कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. पहिल्या वर्षी नफा मिळाला आणि मग उत्साह वाढला. त्यानंतर मत्स्यपालन सुरू केलं. यानंतर या व्यवसायात माझं मन रमू लागलं आणि नफाही वाढू लागला.’ स्कंद कुमार सिंह यांनी सांगितलं की, मत्स्यपालन केल्यानंतर त्यांना त्यांचा व्यवसाय आणखी वाढवायचा होता. त्यामुळेच त्यांचं लक्ष पोल्ट्री फार्मकडे म्हणजेच कुक्कुटपालनाकडे गेलं, हा व्यवसायही आधी देशी कोंबडी पाळून सुरू केला. कारण ते खाणारे शौकीन असतात. यात नफा मिळाल्यानंतर त्यांनी पोल्ट्री फार्म सुरू केलं. आज या दोन्ही व्यवसायांतून वर्षभरात चार ते पाच लाखांचा नफा होतो. तसेच 4-5 जणांना त्यांनी रोजगारही दिला आहे. यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. पूर्वी जे लोक या व्यवसायावरून त्यांना टोमणे मारायचे, तेच लोक आज त्यांचं कौतुक करतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात