जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / फोनवर बोलायला अडवत होती नणंद, वहिनीने कुऱ्हाडीने वार करत काढला काटा

फोनवर बोलायला अडवत होती नणंद, वहिनीने कुऱ्हाडीने वार करत काढला काटा

फोनवर बोलायला अडवत होती नणंद, वहिनीने कुऱ्हाडीने वार करत काढला काटा

मृत रेखा ही वहिणी पुजाच्या चारित्र्यावर संशय घेत होती. त्यातून त्यांचे वाद वाढले होते, हेही पोलिस तपासात समोर आलं आहे. त्यामुळं आपलं लग्न मोडेल पती आपल्याला सोडेल या भीतीनं पुजानं रेखाचा काटा काढला.

  • -MIN READ
  • Last Updated :

जोधपूर, 17 एप्रिल : फोनवर बोलण्यापासून अडवल्याच्या कारवाणावरून वहिनीने नणंदेची कुऱ्हाडीने हत्या केल्याचा प्रकार जोधपूरमध्ये घडला. हत्येनंतर नणंदेचा मृतदेह लोखंडी पेटीत भरून त्यावर महिलेनं अंथरुणही टाकून ठेवलं होतं. पण त्यातून दुर्गंधी येत असल्यानं मृत महिलेच्या मुलीला हा प्रकार समजला आणि तिनं पोलिसांत माहिती दिली. आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून तिनं गुन्हा कबूल देखील केला आहे. (वाचा - अल्पवीयन मुलानं कुऱ्हाडीनं वार करत केली वडिलांची हत्या,थक्क करणारं कारण आलं समोर ) जोधपूरच्या जवळ असलेल्या बडलिया गावातील ही घटना आहे. याठिकाणी मृत रेखा तिच्या लहान मुलीबरोबर राहत होती. तिच्या मोठ्या मुलीचा विवाह झालेला होता. तर मुलगा बाहेरगावी मजुरी करायचा. मृत रेखादेखिल जवळपास मजुरीची कामं करायची. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी रेखाची वहिनी असलेली पुजा तिला भेटायला आली होती. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पुजा रेखाच्या घरी आल्यानंतर कोणाशी तरी फोनवर बोलत होती. त्यावर रेखानं तिला फोनवर बोलण्यापासून अडवलं आणि भावाला याबाबत सांगण्याची धमकी दिली. त्यावर वाद वाढला आणि पुजानं कुऱ्हाडीनं रेखाच्या डोक्यावर वार करत तिची हत्या केली. विशेष म्हणजे ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. घरात कूलर सुरू असल्यानं त्यात रेखाचा आवाज आला नाही. (वाचा - अश्लील व्हिडिओ दाखवून शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड; नातेवाईकांनी दिला चोप ) या घटनेनंतर आरोपी पुजाने रेखाचा मृतदेह घरातील एका लोखंडी पेटीमध्ये भरला आणि त्यावर रोजप्रमाणे अंथरुन ठेवून दिले. यावेळी रेखाची लहान मुलगी घरातच होती, पण तिला काहीही कळलं नाही. पुजानं रेखाला तिची आई कामासाठी बाहेर गेल्याचं सांगितलं. ही घटना 14 एप्रिलला पहाटे घडली होती. त्यानंतर 15 एप्रिलला जेव्हा रेखाची मुलगी लोखंडी पेटीवर अंथरूण ठेवायला गेली, त्यावेळी तिला यातून दुर्गंधी आली. त्यानंतर ही पेटी उघडली तर सर्व प्रकार समोर आला. पुजाने रेखा कामासाठी गेल्याचं सांगितल्यामुळं मुलगी निश्चिंत होती, पण नंतर तिला आईची हत्या झाल्याचं समजलं. पोलिसांना ही सर्व माहिती समजल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी रेखाची वहिणी पुजाला ताब्यात घेत चौकशी केली, तर तिनं पोलिसांसमोर लगेचच गुन्हा मान्य केला. मृत रेखा ही वहिनी पुजाच्या चारित्र्यावर संशय घेत होती. त्यातून त्यांचे वाद वाढले होते, हेही पोलिस तपासात समोर आलं आहे. त्यामुळं आपलं लग्न मोडेल पती आपल्याला सोडेल या भीतीनं पुजानं रेखाचा काटा काढला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात