अश्लील व्हिडिओ दाखवून शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड; नातेवाईकांनी दिला चोप

अश्लील व्हिडिओ दाखवून शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड; नातेवाईकांनी दिला चोप

एका शिक्षकानं (Teacher) शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थिनीला (Student) अश्लील व्हिडिओ (Pornographic Video) दाखवून तिची छेड काढण्याचा (Sexual molestation) प्रयत्न केला आहे.

  • Share this:

चंदीगड, 17 एप्रिल: शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकानं अश्लील चाळे (Teacher molested student) केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोपी शिक्षकानं शिकवणीसाठी येणाऱ्या एका विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ (Pornographic Video) दाखवून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती पीडितेनं आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी संबंधित आरोपी शिक्षकाच्या तोंडाला काळं फासून चांगलाच चोप (Relative beat teacher) दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.

संबंधित घटना पंजाबमधील फगवाडा येथील एका खाजगी शाळेतील आहे. हा संतापजनक प्रकार उघड होताच शहरात खळबळ उडाली आहे. संबंधित नातेवाईकांनी आरोपी शिक्षकाला काळं फासून चांगलाच चोप दिला आहे. शिवाय त्याला मुख्याध्यापकाकडे नेण्यात आलं असून कारवाईची मागणी केली आहे. यानंतर शाळा प्रशासनाने तातडीनं कारवाई करत संबंधित शिक्षकाचं निलंबन केलं आहे. संबंधित घटना फगवाडा शहरातील सुभाष नगरच्या एसडी मॉडल स्कुलमधील आहे.

नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की, संबंधित शिक्षकानं त्यांच्या मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित पीडित विद्यार्थिनी आरोपी शिक्षकाकडे शिकवणीसाठी जाते. गेल्या सोमवारी पीडित मुलगी शिकवणीसाठी गेली असता आरोपीनं तिला अश्लील व्हिडीओ दाखवला आणि गैरवर्तन करण्याचा प्रयत्न देखील केला. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीने मंगळवारी आपल्या पालकांना घटनेची माहिती दिली.

हे ही वाचा- मित्राच्या पत्नीला धमकावून ठेवले शारीरिक संबंध आणि लाखो रुपयेही बळकावले

दरम्यान बैसाखी आणि आंबेडकर जयंती निमित्त शाळेला सुट्टी असल्यानं नातेवाईकांनी शुक्रवारी शाळेत येऊन आरोपी शिक्षकाची चांगलीच धुलाई केली आहे. संबंधित आरोपी शिक्षक हा मुळचा हिमाचल प्रदेशचा रहिवासी आहे. संबंधित शिक्षकाला शाळा प्रशासनाने तातडीनं निलंबित केलं आहे. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी नवदीप सिंह यांनी सांगितलं की, आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून संबंधित घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Published by: News18 Desk
First published: April 17, 2021, 12:22 PM IST

ताज्या बातम्या