जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / सर्व सीमाच ओलांडली; पत्नी माहेरी गेली म्हणून भावाचा सख्ख्या बहिणीवर वारंवार बलात्कार, भाच्याची हत्या

सर्व सीमाच ओलांडली; पत्नी माहेरी गेली म्हणून भावाचा सख्ख्या बहिणीवर वारंवार बलात्कार, भाच्याची हत्या

सर्व सीमाच ओलांडली; पत्नी माहेरी गेली म्हणून भावाचा सख्ख्या बहिणीवर वारंवार बलात्कार, भाच्याची हत्या

माणूस आणि पशूमधील अंतरही आपण विसरून गेलो आहोत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 20 फेब्रुवारी : हे नराधम कसे काय भाऊ असू शकतात? मात्र एकाच आईच्या पोटी जन्म झाल्यामुळे नात्याने ते भाऊच आहेत. मोठा भाऊ सातत्याने आपल्या बहिणीवर बलात्कार करीत राहिला. त्याने आटं-लोटं या पद्धतीने लग्नानंतर पत्नी माहेरी गेल्याचा सूड बहिणीवर उगारत राहिला. तर छोट्या भावाने याच बहिणीच्या 4 वर्षांच्या मुलाला विष देऊन मारून टाकलं. हृदयाचा थरकाप उडवणारा हा प्रकार मंदसोर (Madhya Pradesh News) येथील एका महिलेसोबत घडला आहे. या राक्षसी भावांपासून स्वत:चा बचाव करीत जेव्हा महिला आपल्या पतीकडे गेली, तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. दुसरीकडे भावांनी बहिण बेपत्ता असल्याची तक्रार केली तर तिचा शोध घेत पोलीस महिलेच्या पतीपर्यंत पोहोचले. यानंतर महिलेने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना तुरुंगात रवाना केलं आहे. ही घटना मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्ह्यातील अफजलपूर पोलीस हद्दीतील एका गावातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये येथे राहणाऱ्यांच्या भाऊ-बहिणींचं आटं-लोटं पद्धतीत लग्न झालं होतं. भावाचं लग्न सुशीलासोबत आमि बहिण निर्मालाचं लग्न सुशीलाचा भाऊ संजीवसोबत झाली होती. इच्छा नसतानाही निर्मलाने भावांसाठी हे लग्न केलं. एका वर्षानंतर निर्मलाला एक मूल झालं. सुशीलाला मुलगी झाली. पतीसोबत वाद झाल्यामुळे दीड वर्षांनंतर सुशीला आपल्या माहेरी निघून गेली. याच्या रागात सुशीलाच्या पतीनेही आपली बहीण निर्मलाला रागाच्या भरात तिच्या सासरहून घेऊन आला. पत्नी आली नाही, म्हणून बहिणीवर बलात्कार… पीडित निर्मलाने पोलिसांना सांगितलं की, दीड वर्षांनतर भाऊ आणि वहिणीमधीन वाद मिटला नाही, तर भाऊ सतत चिडचिड करू लागला. तब्बल अडीच महिन्यापूर्वी सर्वजण कामावर गेले असताना भावाने तिच्यावर जबरदस्ती केली. विरोध केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला, मात्र तिनेही गप्प राहायला सांगितलं. यानंतरही भावाने अनेकदा तिच्यावर बलात्कार केले. हे ही वाचा- वर्धा हादरलं! काळोख होताच साधली संधी; एकाच नराधमाकडून 3अल्पवयीन मुलींवर बलात्कार छोट्या भावाने 4 वर्षांच्या भाच्याला दिलं विष… मोठ्या भावांच्या धमकींनी घाबरलेल्या बहिणीने हेच आपलं नशीब मानलं होतं. तो कामावर जाऊ लागली होती. कामावर जाताना ती आपल्या 4 वर्षांच्या मुलाला 17 वर्षीय छोट्या भावाजवळ सोडून जात होती. एके दिवशी भावाने भाच्याची देखभाल करण्याच्या बदल्यात बहिणीकडे मोबाइलची मागणी केली. यावेळी बहिणीने पैसे नसल्याचं सांगितलं. आणि तूच काहीतरी काम का करीत नाही असा सल्ला दिला. याच्या रागात छोट्या भावाने 5 जानेवारी 2022 स्वत:च्याच भाच्याला किटननाशक दिलं. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 4 वर्षांच्या मुलाने किटकनाशक प्यायल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. मुलाच्या मृत्यूनंतर बहिणीवर भावाने 5 फेब्रुवारी रोजी बलात्कार केला. शेवटी 14 फेब्रुवारीला संधी साधत तिने तेथून पळ काढला आणि ती आपल्या सासरी निघून गेली. बहिणीने घर सोडल्यानंतर भावाने पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला. काय आहे साटं-लोटं प्रथा? या प्रथेअंतर्गत ज्या घरातील सून केली जाते त्याच घरात आपली मुलगी पाठवली जाते. मात्र या प्रथेचे अनेक दुष्परिणामही समोर आले आहेत. अनेकदा दोघांपैकी एकाही घरातील महिलेला त्रास दिल्यास त्याचा सूड म्हणून दुसऱ्या घरातील महिलेलाही त्रास दिला जातो.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात