सावरकरांच्या पुण्यतिथीलाच विधान परिषदेत भाजपचा उडाला फज्जा!

सावरकरांच्या पुण्यतिथीलाच विधान परिषदेत भाजपचा उडाला फज्जा!

जे विधानसभेत कमावले ते विधानपरिषदेत गमावलं अशी भाजपची अवस्था झाली.

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी :  सत्तेवरुन पायउतार झाल्यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा सावरकर यांचा मुद्दा हाती घेत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु, विधानपरिषदेत भाजपचाच फज्जा उडाला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव मांडण्याच्या मुद्यावर भारतीय जनता पक्षाचा आज विधानपरिषदेत चांगलीच कोंडी झाली. दिवसभराचं कामकाज झाल्यावर भाजपनं हा प्रस्ताव मांडायचा प्रयत्न करताच उपसभापती नीलम गो-हे यांनी दिवसभराचं कामकाज स्थगित केलं. त्यामुळे विधानसभेत सावकारांच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपला मग कामकाज संपल्यावर प्रतिसभागृह भरवून समाधान मानावं लागलं.

खरंतर कामाकाजाच्या सुरुवातीलाच भाजपनं हा मुद्दा आक्रमकपणे मांडला असता तर त्याची दखल घेतली गेली असती. पण जे विधानसभेत कमावले ते विधानपरिषदेत गमावलं अशी भाजपची अवस्था झाली.

आज विधानपरिषदेत राज्यातील शाळांमध्ये मराठी सक्तीचा करण्याचे विधेयक, लक्षवेधी सूचना, प्रश्नोत्तराचा तास हे सगळं झालं. पण हे होताना सावरकरांचा प्रस्ताव मांडण्याची घाई न करणे याचा भाजपला चांगलाच फटका बसला. आणि शेवटी सावरकरांच्या गौरवाचा मुद्दा पक्षाला विधान परिषदेत मांडता आलाच नाही.

सावरकरांच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक

दरम्यान, आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सावरकर गौरव प्रस्ताव फेटाळल्यामुळे विधासभेत एकच गोंधळ उडाला. भाजपा आमदारांनी सभागृहामध्ये मोठ्याने घोषणाबाजी दिली. सावरकर गौरव प्रस्ताव हा नियमांत बसत नाही, असं सांगत नाना पटोलेंनी प्रस्ताव फेटाळला. अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळताच सभागृहात गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू झाली.

 

केंद्राने सावरकरांना का दिला नाही भारतरत्न? - अजित पवार

सावरकरांचं काम खूप मोठं आहे. त्यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे. तर गेल्या 5 वर्षामध्ये फडणवीसांनी भारतरत्न का दिला नाही? असा सवाल यावेळी अजित पवारांनी उपस्थित केला. यावर फडणवीसांनी अतिशय आक्रमक प्रतिक्रिया देत 'शिदोरी' मासिकावर बंदी घालावी अशी मागणी फडणवीसांनी केली  आहे.

खरंतर आज (26 फेब्रुवारी )सावरकारांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त भाजपने विधिमंडळाच्या परिसरात सावकरांची प्रतिमा लावून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात आले होते. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी त्यांना सावरकरांना अभिवादन करण्याची विनंती केली. त्यानंतर थोरातांनीही सावरकरांना पुष्पांजली अर्पण केली. त्यामुळे राजकीय वातावरणात वेगळी चर्चा सुरू झाली. तर महापुरुषांचं योगदान नाकारून चालणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

अजित पवार म्हणाले होते की, महापुरुषांच्या कामावरून वाद होऊ नये. सावरकरांचं अनेक क्षेत्रातलं योगदान हे नाकारून चालणार नाही. उगाच त्यावरून वाद निर्माण करू नये. असा वाद निर्माण करून समाजात गैरसमज पसरविण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत असा आरोपही त्यांनी केला होता.

First published: February 26, 2020, 7:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading