पाटणा, 31 मे : बिहारमध्ये भाजप नेत्याची हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. बेगूसराय जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. गोपाळ सिंह असं हत्या करण्यात आलेल्या भाजप नेत्याचं नाव आहे. गोपाळ सिंह हे भाजपचे पंचायत अध्यक्ष होते. आपल्या घराच्या बाहेर झोपलेले असताना त्यांची हत्या करण्यात आली. घराच्या बाहेर गोपाळ सिंह एकटेच झोपलेले होते. या हत्येची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सध्या गावात शांतता आहे. आरोपींना पडका अशी मागणी आता गावकरी करत आहेत. स्मृती इराणी यांच्या सचिवाची हत्या यापूर्वी 26 मे रोजी उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये खासदार स्मृती इराणी यांच्या माजी सचिवाची हत्या गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. सुरेंद्र सिंह असं त्यांचं नाव होतं. सुरेंद्र सिंह घराबाहेर झोपले होते. तेव्हा अज्ञात व्यक्तींनी त्यांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी रात्री सुरेंद्र सिंह जेव्हा घराबाहेर झोपले होते तेव्हा त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या सिंह यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचार करुन डॉक्टरांनी त्यांना लखनऊ येथील रुग्णालयात नेण्यास सांगितले. लखनऊला घेऊन जाताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. वाजपेयी सरकार आणि मोदी 2.0मध्ये काय आहे फरक? स्मृती इराणींची प्रतिज्ञा स्मृती इराणी यांनी सुरेंद्र सिंह यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सिंह यांच्या पार्थिवाला खांदा देखील दिला. शिवाय, सिंह यांची हत्या करणारा आणि त्याच्या हत्येचा आदेश देणाऱ्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञाच घेतली. या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं तर मी सुप्रीम कोर्टातही जाईल असंही त्या म्हणाल्या. VIDEO : अवमान झाल्याने शरद पवारांनी मोदींच्या शपथविधीला जाणं टाळलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







