नवी दिल्ली, 31 मे : नरेंद्र मोदी यांनी 30 मे ( गुरूवारी ) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 76 वरून 58 झाली आहे. मोदी 2.0 सरकारमध्ये सुषमा स्वराज, अरूण जेटली, सुरेश प्रभू, मेनका गांधी आणि राधामोहन सिंह यांच्या नावाचा समावेश नाही. 2014मध्ये या सर्वांच्या खांद्यावर मोदी यांनी जबाबदारी दिली होती. मंत्रिपदी नसलेल्यांमध्ये सुषमा स्वराज आणि अरूण जेटली ही प्रमुख नावं आहेत. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची तुलना आता अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारशी केली जात हे. कारण, वाजपेयी सरकारमध्ये असलेले दोन मंत्री मात्र मोदी 2.0 सरकारमध्ये नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागी कोण असणार यावर आता चर्चा होताना दिसत आहे. शिवाय, कुणाकडे कोणतं खातं याकडे देखील सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अमित शहा कसे झाले पॉवरफुल? ही आहे Inside स्टोरी नड्डा होऊ शकतात भाजपा अध्यक्ष नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्य़े अमित शहा यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे आता जे. पी. नड्डा यांच्याकडे भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते अशी शक्यता आहे. आज होणार मंत्रालयाचे वाटप सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या कॅबिनेट बैठकीत मंत्रालयांचे वाटप होऊ शकते. मोदी सरकार 2.0 मध्ये एकूण 57 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यात 24 कॅबिनेट मंत्री, 24 राज्य मंत्री तर 9 राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) आहे. मोदींनी यावेळी मंत्रिमंडळात 20 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. देशातील सर्वात गरीब खासदार; ओडिशाच्या मोदींबद्दल तुम्हाला माहित आहे? जेडीयुचा नकार बिहारमधील मित्र पक्ष असलेल्या जेडीयुनं मात्र मंत्रिपदासाठी नकार दिला. पण, आम्ही NDAसोबत असल्याचं नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं. बिहारमध्ये भाजपनं जेडीयुसोबत आघाडी केली होती. VIDEO : अवमान झाल्याने शरद पवारांनी मोदींच्या शपथविधीला जाणं टाळलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







