जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून काम करत असताना पकडलेच जाणार होते अजित डोवाल, अंडरकव्हर एजंट म्हणून यशस्वी कामगिरी

पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून काम करत असताना पकडलेच जाणार होते अजित डोवाल, अंडरकव्हर एजंट म्हणून यशस्वी कामगिरी

पाकिस्तानात अंडरकव्हर एजंट (undercover agent) म्हणून काम करत असताना एका मौलवीने अजित डोवल (Ajit doval) यांना ओळखलं होतं. तो त्यांना म्हणाला की, “तुम्ही हिंदू आहात. तुमचे कान टोचलेले आहेत.”

01
News18 Lokmat

1)भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार(National Security Advisor) अजित डोवाल(Ajit Doval) यांचा आज वाढदिवस. भारतातील जेम्स बॉण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोवाल यांनी भारतासाठी अनेक गुप्त कारवायांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. वेष बदलून पाकिस्तानमध्ये 7 वर्ष राहणं असो किंवा निवृत्तीनंतर देखील देशासाठी काम करणं असो. सर्जिकल स्ट्राईकचे मास्टरमाईंड असणाऱ्या अजित डोभाल यांच्या वाढदिवशी आज आपण त्यांचे विविध पैलू जाणून घेणार आहोत. (Photo-news18 English via PTI)

जाहिरात
02
News18 Lokmat

  1. उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे 20 जानेवारी 1945 ला अजित डोभाल(Ajit Doval) यांचा जन्म झाला. अजमेरच्या मिलिटरी स्कुलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर आगरामधून अर्थशास्त्रात पदवी घेतली. परंतु भविष्यात ते कोणत्या क्षेत्रात जाणार याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. अर्थशास्त्रासारख्या विषयात शिक्षण घेऊन देखील त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याचा निर्णय घेतला. (Photo- news18 English via PTI)

जाहिरात
03
News18 Lokmat

3)अजित डोभाल(Ajit Doval) हे 1968 च्या आयपीएस(IPS ) केडरचे अधिकारी आहेत. 1972 मध्ये ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (IB ) काम करू लागले. या ठिकाणी त्यांना जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांनी विविध मोहिमांमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून काम करत असताना त्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध झाले आहेत. 2005 साली ते इंटेलिजेन्स ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते.

जाहिरात
04
News18 Lokmat

4)अजित डोभाल यांनी पाकिस्तानमध्ये सात वर्षे गुप्तहेर म्हणून काम केले. तेथे जाण्यापूर्वी त्यांना कुराणाचा अभ्यास करावा लागला. मुस्लिम धर्मग्रंथांची माहिती घ्यावी लागली. एकदा त्यांना पाकिस्तानमध्ये एकाने ओळ्खल्याची कथादेखील त्यांनी सांगितली होती. यामध्ये पाकिस्तानात एकेदिवशी मशिदीत गेले असताना एक मौलवी म्हणाला की तुम्ही हिंदू आहात. डोवाल यांनी आपण मुस्लिमच असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पण, तो मौलवी डोभाल यांना आपल्या खोलीमध्ये घेऊन गेला. आपण अजूनही हिंदू देवतांची पूजा करतो, असे त्याने सांगितले. डोभाल यांनी विचारले, की ते हिंदू असल्याचे त्यांनी कसे ओळखले? यावर फकिराने सांगितले, की डोवाल यांचे कान टोचलेले आहे. या व्यक्तीने डोवाल यांना प्लॅस्टिक सर्जरी करून घेण्याचा सल्ला देखील दिला. हिंदूंमध्ये लहानपणीच बाळांचे कान टोचतात. मुस्लिमांमध्ये ती परंपरा नाही.

जाहिरात
05
News18 Lokmat

5)गुप्तहेर म्हणून काम करताना अजित डोभाल(Ajit Doval) अनेक बारीक गोष्टींचा अभ्यास करत असत. त्यांच्या हाताखाली काम केलेल्या एका अधिकाऱ्याने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी माहिती दिली होती. पाकिस्तानमध्ये काम करताना ते बनियान आणि पायजमावर राहत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी मुस्लिम धर्मग्रंथांची माहिती घेतली. मुस्लिम आचार-विचार, पेहराव, चालीरीती आत्मसात कराव्या लागल्या. (Photo- moneycontrol)

जाहिरात
06
News18 Lokmat

6)1989 मध्ये पंजाबच्या सुवर्ण मंदिरात राबवलेल्या ऑपरेशन ब्लॅक थंडरचे(Operation Black Thunder) नेतृत्व देखील डोभाल (Ajit Doval)यांनी केले होते. साधारणपणे कीर्ती चक्र हे सैन्यातील अधिकाऱ्यांना दिले जाते. परंतु डोभाल यांच्या कामगिरीमुळे पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्याला कीर्ती चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. ऑपरेशन ब्लॅक थंडरमध्ये रिक्षाचालक बनून डोभाल यांनी सुवर्ण मंदिरातून हत्यारे, नकाशा आणि दहशतवाद्यांची संपूर्ण माहिती हस्तगत केली होती. (Photo- news18 English)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून काम करत असताना पकडलेच जाणार होते अजित डोवाल, अंडरकव्हर एजंट म्हणून यशस्वी कामगिरी

    1)भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार(National Security Advisor) अजित डोवाल(Ajit Doval) यांचा आज वाढदिवस. भारतातील जेम्स बॉण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोवाल यांनी भारतासाठी अनेक गुप्त कारवायांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. वेष बदलून पाकिस्तानमध्ये 7 वर्ष राहणं असो किंवा निवृत्तीनंतर देखील देशासाठी काम करणं असो. सर्जिकल स्ट्राईकचे मास्टरमाईंड असणाऱ्या अजित डोभाल यांच्या वाढदिवशी आज आपण त्यांचे विविध पैलू जाणून घेणार आहोत. (Photo-news18 English via PTI)

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून काम करत असताना पकडलेच जाणार होते अजित डोवाल, अंडरकव्हर एजंट म्हणून यशस्वी कामगिरी

    2) उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे 20 जानेवारी 1945 ला अजित डोभाल(Ajit Doval) यांचा जन्म झाला. अजमेरच्या मिलिटरी स्कुलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर आगरामधून अर्थशास्त्रात पदवी घेतली. परंतु भविष्यात ते कोणत्या क्षेत्रात जाणार याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. अर्थशास्त्रासारख्या विषयात शिक्षण घेऊन देखील त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याचा निर्णय घेतला. (Photo- news18 English via PTI)

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून काम करत असताना पकडलेच जाणार होते अजित डोवाल, अंडरकव्हर एजंट म्हणून यशस्वी कामगिरी

    3)अजित डोभाल(Ajit Doval) हे 1968 च्या आयपीएस(IPS ) केडरचे अधिकारी आहेत. 1972 मध्ये ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (IB ) काम करू लागले. या ठिकाणी त्यांना जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांनी विविध मोहिमांमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून काम करत असताना त्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध झाले आहेत. 2005 साली ते इंटेलिजेन्स ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून काम करत असताना पकडलेच जाणार होते अजित डोवाल, अंडरकव्हर एजंट म्हणून यशस्वी कामगिरी

    4)अजित डोभाल यांनी पाकिस्तानमध्ये सात वर्षे गुप्तहेर म्हणून काम केले. तेथे जाण्यापूर्वी त्यांना कुराणाचा अभ्यास करावा लागला. मुस्लिम धर्मग्रंथांची माहिती घ्यावी लागली. एकदा त्यांना पाकिस्तानमध्ये एकाने ओळ्खल्याची कथादेखील त्यांनी सांगितली होती. यामध्ये पाकिस्तानात एकेदिवशी मशिदीत गेले असताना एक मौलवी म्हणाला की तुम्ही हिंदू आहात. डोवाल यांनी आपण मुस्लिमच असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पण, तो मौलवी डोभाल यांना आपल्या खोलीमध्ये घेऊन गेला. आपण अजूनही हिंदू देवतांची पूजा करतो, असे त्याने सांगितले. डोभाल यांनी विचारले, की ते हिंदू असल्याचे त्यांनी कसे ओळखले? यावर फकिराने सांगितले, की डोवाल यांचे कान टोचलेले आहे. या व्यक्तीने डोवाल यांना प्लॅस्टिक सर्जरी करून घेण्याचा सल्ला देखील दिला. हिंदूंमध्ये लहानपणीच बाळांचे कान टोचतात. मुस्लिमांमध्ये ती परंपरा नाही.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून काम करत असताना पकडलेच जाणार होते अजित डोवाल, अंडरकव्हर एजंट म्हणून यशस्वी कामगिरी

    5)गुप्तहेर म्हणून काम करताना अजित डोभाल(Ajit Doval) अनेक बारीक गोष्टींचा अभ्यास करत असत. त्यांच्या हाताखाली काम केलेल्या एका अधिकाऱ्याने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी माहिती दिली होती. पाकिस्तानमध्ये काम करताना ते बनियान आणि पायजमावर राहत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी मुस्लिम धर्मग्रंथांची माहिती घेतली. मुस्लिम आचार-विचार, पेहराव, चालीरीती आत्मसात कराव्या लागल्या. (Photo- moneycontrol)

    MORE
    GALLERIES

  • 06 06