पटना, 24 जून : बंगळुरूमधील IAS अधिकाऱ्याच्या आत्महत्येनंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या पोलीस विभागात म्हणून नावलौकिक असलेल्या सेवानिवृत्त डीएसपी यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. त्यांनी राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. सेवानिवृत्त डीएसपी के चंद्रा यांच्या नावावर पोलीस दलात 64 एन्काउंटरची नोंद होती. पोलीस दलातील एनकाउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के चंद्रा यांनी उचलेल्या या टोकाच्या पावलामुळे मोठी खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळावर पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली आहे. कुटुंबीय आणि पोलीस विभागासाठी ही लिहिल्याची माहिती मिळाली आहे. के. चंद्रा हे खूप डिप्रेशनमध्ये होते. 16 वर्षांपासून ते यासाठी उपचारही घेत होते मात्र मानसिक आजारातून ते बरे होऊ शकले नाहीत.
हे वाचा-'कोरोनिल'ची जाहिरात थांबवा, आधी सविस्तर माहिती द्या; केंद्राचा पतंजलीला दणका
सुसाईट नोटमध्ये काय म्हणाले के. चंद्रा...
'मला माफ करा. डिप्रेशनमुळे मला गेले अनेक महिन्यांपासून झोपच लागत नाही. मला हे दु: ख सहन होत नाही. त्यामुळे मी हे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. माझा मोबाईलनंबर सुरू ठेवा कारण घरातील सर्व महत्त्वाच्या कामांसाठी तो गरजेचा आहे. बँक, गॅस, वीज आणि आयकरसाठी तो महत्त्वाचा आहे. बँकेत जावून माझं पेन्शन बंद करून आईच्या नावानं सुरू करावं लागेल.
मी गेल्या 16 वर्षांपासून खूप डिप्रेशनमध्ये आहे. यासाठी मी आजवर अनेक उपचार घेतले पण त्यातून बरा होऊ शकलो नाही. कॉलनीमधील संतोष सिन्हा यांच्या छळामुळे हे डिप्रेशन शिगेला पोहोचले त्यांच्या छळाला कंटाळून मी हे पाऊल उचलत आहे असं के. चंद्र यांनी पोलिसांसाठी सुसाईट नोटमध्ये लिहिल्याची माहिती मिळाली आहे.'
हे वाचा-धक्कादायक! बंगळुरुतील IAS अधिकाऱ्याची आत्महत्या, राहत्या घरात घेतला गळफास
बिहार पोलीस दलात 37 वर्ष सेवा केल्यानंतर के. चंद्रा यांची ओळख एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 64 एन्काउंटर केले याशिवाय अनेक गुन्हेगारांवर कारवाई केली. 2012 मध्ये के चंद्रा सोनपूरमधून रेल्वे डीएसपीपदावरून निवृत्त झाले. के चंद्राचा एक मुलगा मुंबईत बँक अधिकारी असून दुसरा पटना उच्च न्यायालयात वकील आहे.
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar News, Bihar police, Coronavirus, Coronavirus disease, Coronavirus update, Sucide attempt, Sucide case