Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'कोरोनिल'ची जाहिरात थांबवा, आधी सविस्तर माहिती द्या; केंद्राचा पतंजलीला दणका

'कोरोनिल'ची जाहिरात थांबवा, आधी सविस्तर माहिती द्या; केंद्राचा पतंजलीला दणका

coronil मुळे सात दिवसांत 100 टक्के कोरोना रुग्ण बरे झाल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला.

coronil मुळे सात दिवसांत 100 टक्के कोरोना रुग्ण बरे झाल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला.

coronil मुळे सात दिवसांत 100 टक्के कोरोना रुग्ण बरे झाल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला.

नवी दिल्ली, 24 जून : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधातील औषध (coronavirus medicine) आणि लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात पतंजलीने कोरोनाव्हायरसविरोधात औषध शोधून काढलं आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनिल (coronil) हे औषध आज लाँच केलं. यामुळे कोरोना रुग्ण सात दिवसांत बरा होत असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला. आता केंद्र सरकारने पतंजलीला (patanjali) झटका दिला आहे. कोरोनिलची जाहिरात थांबवावी, आधी सविस्तर माहिती केंद्र सरकारला द्यावी असे निर्देश पतंजलीला देण्यात आले आहेत.

पंतजलीने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध कोरोनिल लाँच केलं. या औषधाचा वैज्ञानिक अभ्यास, चाचणी करण्यात आल्याचं पतंजलीने सांगितलं. मात्र याबाबत आयुष मंत्रालयाला काहीच माहिती नाही. त्यामुळे याची सविस्तर माहिती आधी आयुष मंत्रालयाला द्यावी, तोपर्यंत जाहिरात थांबवावी असं आयुष मंत्रालयाने (Ayush ministry) म्हटलं आहे.

पतंजलीच्या रिसर्च सेंटरकडून  280 रुग्णांवर प्रयोग करण्यात आला होता. कोरोनिल औषधाचा रिझल्ट हा शंभर टक्के आहे.  69 टक्के कोरोना रुग्ण 3 दिवसांमध्ये बरे झाले तर 100 टक्के कोरोना रुग्ण सात दिवसांमध्ये बरे झालेत, असं रामदेव बाबा यांनी सांगितलं. संपूर्ण नियमांचे पालन करून हे औषध तयार करण्यात आले आहे, अशी माहिती रामदेव बाबांनी दिली.

हे वाचा - पतंजलीने आणलं Coronil आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले Memes

बालकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दिव्य कोरोनिल टॅब्लेट' मध्ये अश्वगंधा, गिलोय, अणू तेल, श्वासारी रस आणि तुळसी यांसारख्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सिन कनव्हर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते, असंही रामदेव यांनी सांगितलं.

या औषधाची माहिती, त्याचं क्लिनिकल चाचणी कुठे करण्यात आली, त्याला मान्यता कुणी दिली आणि त्याचा परिणाम काय आला, याबाबत सविस्तर माहिती अहवाल सुपूर्द करण्याचे आदेश आयुष मंत्रालयाने दिलेत. तसं उत्तराखंड राज्याच्या संबंधित परवाना प्राधिकरणालाही या उत्पादनाला परवानगी दिल्याच्या तपशील सादर करण्यास सांगितलं आहे.

संपादन - प्रिया लाड

First published:

Tags: Aayush, Coronavirus, Patanjali