मुंबई, 26 ऑगस्ट: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही आटोक्यात आलेली नाही. कोरोना विषाणूसह अनेक मुद्यांवर राज्य मंत्रिमंडळांची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत अनेक लोकहिताचे निर्णय घेण्यात आले. कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य सचिवांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिली. सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा...मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांची अखेर बदली, अनेक बड्या अधिकाऱ्यांनाही हलवलं
महाड येथे झालेली इमारत दुर्घटनेबाबतही चर्चा करण्यात आली. नागरिकांना मदतीबद्दल चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे, अशी माहिती नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ही इमारत अधिकृत होती परंतु सात वर्षांमध्ये इमारत कोसळली अतिशय निकृष्ट दर्जाचे काम त्या इमारतीचं झालं होतं. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर त्याचबरोबर आरसीसी कन्सल्टंट त्याचबरोबर इमारतीसाठी अधिकारी यांनी परवानगी दिली आणि ज्यांचा ज्यांचा दोष आहे, अशा दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
सरकारनं घेतलेले मोठे निर्णय....
-राज्याच्या शहरी भागातील आरोग्य सेवेसाठी ७ नियमित पदांच्या निर्मितीस मान्यता. संचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक या पदांचा समावेश.
-राज्यातील मच्छिमारांना मिळणार विशेष सानुग्रह अनुदान, मंत्रिमंडळाकडून अनुदान देण्यास मान्यता.
-वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी मिळणार करमाफी. टाळेबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर निर्णय.
-मुंबईसह मोठ्या शहरात घर घेणाऱ्यांना सरकारने दिलासा दिलाय.मुद्रांक शुल्कात म्हणजेच स्टॅम्प ड्युटी registration मध्ये कपात करणयात आली आहे. आणि तीही 3 टक्के. डिसेंबर पर्यंत 3 टक्के आणि 1 जानेवारी ते 31मार्च2021 या काळात 2 टक्के इतकी सवलत देण्यात आली आहे.
-टाळेबंदीमुळे अतिरीक्त होणाऱ्या दूधापैकी प्रतिदिन १० लाख लिटर दुध स्विकारणे आणि रुपांतर योजना ऑक्टोबरपर्यंत राबविण्यास मान्यता.
-मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील ८ महानगरपालिका व ७ नगरपालिका क्षेत्राकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यास मान्यता.
हेही वाचा....राष्ट्रवादीवर आरोप करत शिवसेनेच्या खासदाराचा राजीनामा, उद्धव ठाकरेंना दिलं पत्र
-नाशिक जिल्ह्यातील काष्टी (ता.मालेगाव) येथे कृषि विज्ञान संकुल निर्मितीस मान्यता. याअंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयांची होणार स्थापना.
-कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल.