नवी दिल्ली, 22 जून : कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी कोरोना लसीकरण (Corona vaccination) केलं जातं आहे. अनेकांनी कोरोना लशीचे डोस घेतले आहेत. बहुतेकांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस (Corona vaccine second dose) घेतलेले आहेत. त्यामुळे आता मी कोरोनापासून पूर्णपणे सुरक्षित आहे का? मी घराबाहेर पडू शकतो का? बाहेर फिरू शकतो का? गर्दीत जाऊ शकतो का? असे बरेच प्रश्न लोकांच्या मनात आहेत. मोदी सरकारने अशाच प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. कोरोना लशीचे दोन डोस घेतल्यानंतर कुणी जास्त काळजी घ्यायला हवी, याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. वयस्कर व्यक्तींनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ते बाहेर फेरफटका मारू शकतात पण गर्दीत जाऊ शकत नाही, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं. पण संबंधित व्यक्तीला कोणता त्रास तर होत नाही ना, हे त्या व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून आहे, असंही डॉ. पॉल यांनी स्पष्ट केलं. हे वाचा - 24 राज्यांनाही जमलं नाही ते एकट्या शहराने केलं; एका दिवसात सर्वाधिक लसीकरण देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. टप्याटप्प्याने लसीकरण झालं. आता 21 जूनपासून 18 सर्वांचं केंद्र सरकारमार्फत मोफत लसीकरण सुरू झालं आहे. या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी जास्तीत जास्त लोकांनी कोरोना लस घेतली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, भारतात 21 जूनला ऐतिहासिक लसीकरण झालं. एकाच दिवसात तब्बल 88.09 लाख डोस देण्यात आले. सर्वात जास्त लसीकरण मध्य प्रदेशमध्ये झालं आहे. इथं 17 लाखांपेक्षा जास्त डोस देण्यात आले. त्यानंतर कर्नाटकमध्ये 11 लाखांपेक्षा जास्त डोस देण्यात आले. या 10 राज्यांत एकाच दिवसात सर्वात जास्त लसीकरण मध्य प्रदेश - 17 लाख डोस कर्नाटक - 11 लाख डोस यूपी - 7 लाख डोस बिहार - 5.75 लाख डोस हरयाणा - 5.15 लाख डोस गुजरात - 5.15 लाख डोस हे वाचा - ‘तिसरी लाट उंबरठ्यावर असताना अधिक शहाणपणाने वागलेलं बरं’ : आरोग्यमंत्री राजस्थान - 4.60 लाख डोस तामिळनाडू - 3.97 लाख डोस महाराष्ट्र - 3.85 लाख डोस आसाम - 3.68 लाख डोस
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.