औरंगाबाद, 15 जुलै : कोरोना काळात सध्या राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे पोलीस लोकांवर नजर ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र पहिल्यांदाच पोलिसांनी हातात दंडुके नाही तर बॅट घेतली आहे. औरंगाबाद पोलिसांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस रस्त्यावर उतरून क्रिकेट खेळताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर खुर्चीचा स्टम्प करून पोलीस क्रिकेट खेळत आहेत. लॉकडाऊनमध्ये रस्ते सुनसान आहेत, त्यामुळे पोलिसांनी विरंगुळा म्हणून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. संपूर्ण कोरोना लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी आपला जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजावले आहे. यात अनेक पोलिसांनी आपले प्राणही गमावले. मात्र पहिल्यांदाच पोलीस विरंगुळा म्हणून क्रिकेट खेळताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक पोलीस गोलंदाजी करताना दिसत आहेत, तर काही पोलीस फिल्डिंग करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये पोलीस संकटाच्या काळातही आपली ड्युटी करून काही प्रमाणात मज्जा करताना दिसत आहे. वाचा- एका फोटोसाठी बापानं लेकाला खोल दरीमध्ये लटकवलं! धक्कादायक VIDEO VIRAL
वाचा- गावगुंडांची शेतकऱ्याला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण, धक्कादायक VIDEO औरंगाबादचा हा व्हिडीओ मजेशीर असून, काही प्रमाणात संचार बंदीमध्ये ऑन ड्युटी 24 तास असलेले पोलीस मज्जा करताना दिसत आहेत. सध्या मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे शहरात कडक संचारबंदी लागू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. वाचा- रस्त्यावर बसून वाघाने मारली डरकाळी, गाडीतील लोकांची झाली अशी अवस्था; पाहा VIDEO