मुंबई, 19 जुलै: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत (Mumbai Heavy Rainfall) पावसाचं धुमशान पाहायला मिळत आहे. मुंबईसह (Mumbai Rain) उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. अशातच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात (Bhandup pumping station) पहिल्यांदाच पाणी शिरले. त्यामुळे मुंबईत कोसळत असलेल्या पावसाबद्दल भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी भीती व्यक्त केली आहे. तसंच शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे (Cm Uddhav Thackeray) तातडीने बैठक घेण्याची मागणी केली आहे. समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर आला. ओहोटी असताना मिठी नदीचे पाणी ओसरत नाही…गेली 25 वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. या 25 वर्षात असं कधीच घडले नाही. त्यामुळे हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना? याबाबत तातडीने विचार होण्याची गरज आहे, अशी अपेक्षा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली. मुंबईत धोकादायक विदारक चित्र निर्माण झालं असून काल परवापासून मुंबईची स्थिती चिंताजनक आहे. मुंबई धोकादायक उंबरठ्यावर असल्याचंच दिसून येत आहे. मिठी नदी समुद्राकडे पाणी घेऊन जात असते. समुद्राला भरती आली तरच मिठी नदी भरते. काल पहिल्यांदा समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर होता. लोकांच्या घरात पाणी गेलं. याचा अर्थ काय? भांडूपरच्या जलशुद्धीकरण केंद्रातही पाणी शिरले. 26 जुलैच्या पावसातही भांडूप शुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले नव्हते. त्यामुळे हे संकेत आहेत. हे धोकादायक आहे, असंही शेलार म्हणालेत. राज ठाकरे Back In Action! तीन दिवस पुण्यात मुक्काम, असा असेल दौरा पाणी उकळून प्या- पालिकेचं आवाहन भांडुप जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पावसाचे पाणी साचलं. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. यामुळे रविवारी मुंबईतील बऱ्यापैकी भागात पाणीपुरवठा करण्यात आला नाही. म्हणून देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केली कळकळीची विनंती दरम्यान जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करून संध्याकाळी टप्प्याटप्प्याने मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र तरी नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.