...आणि खासदार नवनीत राणांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर!

...आणि खासदार नवनीत राणांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर!

'कुंपणानेच शेत खाल्ले तर दोष कुणाला द्यायचा', अशीच अवस्था सध्या विदर्भाचा नंदनवन समजल्या जाणाऱ्या चिखलदरा पर्यटनस्थळाची झाली आहे

  • Share this:

संजय शेंडे, प्रतिनिधी

अमरावती, 26 फेब्रुवारी :  'कुंपणानेच शेत खाल्ले तर दोष कुणाला द्यायचा', अशीच अवस्था सध्या विदर्भाचा नंदनवन समजल्या जाणाऱ्या चिखलदरा पर्यटनस्थळाची झाली आहे.  खासदार नवनीत राणा यांनी अमरावती चिखलदरा येथे आढावा बैठकी  भेटीदरम्यान सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्यांचे कामाची पाहणी केली या दरम्यान हे भयाण वास्तव समोर आलं आहे. चिखलदरा इथं अवैध स्टोन क्रशर आणि मुरूम उत्खनन सुरू असल्याचं नवनीत राणा यांच्या निदर्शनास आलंय.

हे अवैध स्टोन क्रशर दुसऱ्या कुणाचे नाही तर चिखलदरा येथील नगराध्यक्ष  विजया सोमवंशी यांचे पती, माजी नगराध्यक्ष आणि स्विकृत नगरसेवक राजेंद्र सोमवंशी यांचे आहे. याच ठिकाणी अवैध उत्खनन करण्यात आले. मात्र, महसूल, वनविभाग, सिडको आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे पूर्ण डोळेझाक केली आहे.

खडीकरणाच्या आणि डांबरीकरणाच्या कामात जास्त तफावत असल्याचं खासदार नवनीत राणा यांच्या निदर्शनास आल्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. तसंच सिडकोच्या पैशाचा दुरुपयोग होत असून  चिखलदरा येथील विकास आराखडा हा पर्यटकांच्या सोयीचा आराखडा असावा, अशा सूचना नवनीत राणा यांनी अधिका-यांना दिल्या.

विदर्भातील काश्मीर म्हणून ओळखले जाणारे पर्यटन स्थळ चिखलदरा इथं  प्रवेशासाठी एक विशेष रस्ता बनवण्यात येत आहे. जवळपास 10 कोटी रुपये खर्च  करून असलेला हा रस्ता 5 किमीचा आहे. मात्र, या रस्त्याचं काम निकुष्ठ दर्जाचं होत आहे.

चिखलदरा हे टायगर रिझर्व्ह प्रोजेक्ट तसंच पर्यटन स्थळ आहे. मात्र, असं असताना देखील या ठिकाणी स्टोन क्रॅशर व रस्त्याच्या कामासाठी अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन सुरू आहे. चिखलदराच्या काँग्रेस नगराध्यक्षा विजया सोमवंशी याचे पती राजेंद्र सोमवंशी याचे हे स्टोन्स क्रशर असून अवैध मुरूम उत्खनन सुद्धा त्याचे आहे. शिवाय या स्टोन क्रशरला कुठल्याही परवानगी नाही. याबाबत सिडकोचे अभियंता जामकर यांना विचारले असता त्यांनी उडवा उडावीचे उत्तर दिली. मात्र, अखेर मान्य केले की स्टोन क्रशर आणि मुरूम उत्खननाला कुठलीही परवानगी नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2020 11:17 PM IST

ताज्या बातम्या