जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / कौतुकास्पद! कोरोनाला हरवण्यासाठी आनंद महिंद्रांनी सरकारला दिला स्वत:चा पगार

कौतुकास्पद! कोरोनाला हरवण्यासाठी आनंद महिंद्रांनी सरकारला दिला स्वत:चा पगार

कौतुकास्पद! कोरोनाला हरवण्यासाठी आनंद महिंद्रांनी सरकारला दिला स्वत:चा पगार

महिद्रा अँड महिंद्रा ग्रृपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी व्हेंटिलेटर्स बनवण्याचा आणि त्याचप्रमाणे त्यांचा एक महिन्याचा पगार मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22  मार्च : चीनच्या वुहानमधून संक्रमणास सुरूवात झालेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगभरात पाय रोवायला सुरूवात केली आहे. भारतामध्ये देखील रुग्णांची संख्या वाढत आहेत. भारतामध्ये कोरोनाचं संक्रमण न थांबल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेतच, पण त्याबरोबरच सरकारला सर्वांच्याच सहकार्याची गरज आहे. त्याचप्रकारे आपण कोरोनाला हरवू शकतो. (हे वाचा- ‘माझ्या कुटुंबातील सदस्य घरात क्वारन्टाइन, मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवू नका’) अशा परिस्थितीत अनेक सेलिब्रिटी, उद्योगपती सर्वांनाच घरी राहण्याचा सल्ला देत आहेत. मात्र काहीजण असे देखील आहेत, ज्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. महिद्रा अँड महिंद्रा ग्रृपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी अशाप्रकारे मदत करण्याचा निर्णय घेत सर्वांपुढे एक आदर्शच ठेवला आहे. आनंद महिंद्रा यांनी व्हेंटिलेटर्स बनवण्याचा आणि त्याचप्रमाणे त्यांचा एक महिन्याचा पगार मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. (हे वाचा- ‘मी कोरोना पॉझिटिव्ह’, Tiktokवर व्हिडीओ टाकणाऱ्या तरुणावर पोलिसांनी केले उपचार) रविवारी आनंद महिंद्रा यांनी काही ट्वीट करत कोरोना व्हायरस संदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये असं म्हणाले की, अनेक अहवालांनुसार असं आणि तज्ज्ञांच्या मते असं म्हटलं जात आहे की भारत कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या स्टेजमध्ये पोहोचला आहे, असं असेल तर करोडो लोकांच्या जीवाला धोका आहे. मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर देखील त्याचा वाईट परिणाम होणार आहे.

जाहिरात

महिंद्रा यांनी पुढे म्हटलं आहे की, पुढील काही आठवड्यांमध्ये लॉक डाऊन केल्यास कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येत घट होईल. परिणामी मेडिकल सुविधांवरील भार सुद्धा कमी होईल. दरम्यान काही टेम्पररी हॉस्पीटल आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था करणे गरजेचे आहे. महिंद्रा ग्रृपने व्हेंटिलेटर बनवण्यासंदर्भात कामाला सुरूवात केली असल्याचंही ते म्हणाले. त्याचप्रमाणे महिंद्रा ग्रृपकडून त्यांचे रिसॉर्ट्स देखील ठराविक काळासाठी मेडिकल सुविधांसाठी देण्यात आले आहेत. यामध्ये सरकार आणि सेनेची मदत करण्यासाठी या रिसॉर्टचा वापर करण्यात आला आहे.

For more Solutions from CBSE Board, please Click here:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात