अमरावती, 11 ऑगस्ट : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील बारा जणांना कोरोनाची बाधा झाली असून सर्वांवर उपचार सुरू आहे. मात्र, उपचारादरम्यान नवनीत राणा यांची तब्बेत बिघडल्याचे वृत्त आहे.
नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना नागपूरच्या ओखार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
6 ऑगस्ट रोजी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet rana)यांच्यासह त्याच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. धक्कादायक म्हणजे नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा (Ravi rana) यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला.
राणा कुटुंबातील 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले. या सदस्यांमध्ये नवनीत राणांच्या मुले आणि सासू-सासऱ्यांचाही समावेश आहे.
आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं कळल्यावरगेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही नवनीत राणा यांनी केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.