मुंबई 5 एप्रिल: दिव्या भारती (Divya Bharti) ही 90 दशकात बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री होती. ग्लॅमरस लूक, मादक अदा आणि जबरदस्त अभिनय शैलीच्या जोरावर तिनं खूप कमी वयात प्रचंड यश मिळवलं होतं. परंतु या यशाचा उपभोग मात्र ती घेऊ शकली नाही. त्याआधीच तिचा मृत्यू झाला. दिव्या भारतीचा मृत्यू नेमका झाला तरी कसा? याचं गूढ रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. मात्र तिच्या मृत्यूचा बॉलिवूड सिनेसृष्टीला जबरदस्त झटका लागला. तिच्या मृत्यूनंतर अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्यासोबत काही विचित्र घटना घडू लागल्या होत्या. पाहूया नेमकं काय होतं ते प्रकरण...
लाडला (Laadla) हा दिव्याचा शेवटचा चित्रपट होता. चित्रीकरण देखील सुरु झालं होतं. दिव्यानं काही सीनही शूट केले होते. मात्र हा चित्रपट पुर्ण होण्याआधीच तिचा मृत्य झाला. त्यामुळं निर्मात्यांनी दिव्याच्या जागी श्रीदेवी यांना कास्ट केलं. परंतु या चित्रपटामुळं श्रीदेवी यांना काही विचित्र अनुभव येऊ लागले होते. त्यांनी कितीही पाठांतर केलं तरी सेटवर त्या डायलॉग्स विसरायच्या. विशेष म्हणजे दिव्या भारती जे शब्द विसरत होती तेच शब्द त्या विसरायच्या. एकदा तर शक्ती कपूर आणि रविनासोबत एक सीन शूट करत असताना अचानक त्या जागीच स्तब्ध झाल्या. अन् बराच काळ त्या काहीच बोलल्या नाही. त्यावेळी श्रीदेवींचा चेहरा पाहून रविना टंडन देखील खूप घाबरली होती. अखेर सतत घडणाऱ्या या विचित्र घटना थांबवण्यासाठी निर्मात्यांनी चित्रीकरण काही काळ थांबवलं. पटकथेत काही बदल केले मग तो चित्रपट शूट झाला. शक्ती कपूर यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. आज दिव्या भारतीची डेथ एनिव्हर्सरी आहे. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
अवश्य पाहा - राम सेतूच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट; 45 कलाकारांना झाली Covid-19 ची लागण
लाडला हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात श्रीदेवींसोबत रविना टंडन, अनिल कपूर, शक्ती कपूर, फरिदा जलाल या कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. राज कनवर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाचं यश निर्मात्यांनी दिव्या भारतीला अर्पण केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.