अमरावती, 28 मे: महाराष्ट्रातील कोरोनोची आकडेवारी (Coronavirus Cases in Maharashtra) गेल्या एक-दोन दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. अनेक जिल्ह्यातून दिलासादायक बातमी समोर येत आहे. अमरावती (COVID-19 Update in Amaravati) जिल्ह्यात देखील गेल्या आठडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली आहे. पंधरा दिवसात जिल्ह्यात कोरोनाचे 12578 रुग्ण आढळले तर 256 रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र गेल्या आठवडाभरात विचार केला तर सात दिवसात 4776 रुग्ण आढळले 99 रुग्णांचा मृत्यू झाला. आधीच्या आठवड्यापेक्षा ही रुग्णसंख्या तब्बल 3024 ने कमी झालेली आहे, तर मृत्यूदेखील 58 कमी झालेले आहे. आता जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी व्हायला लागली असून पुढच्या आठवड्यात आणखी रुग्ण कमी होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. जिल्ह्यात तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात लहान बालकांसाठी 50 बेडचं एक रुग्णालय उभारण्यात येणार आहे. शिवाय जिल्ह्यात खासगी तीन बाल रुग्णालयाला कोविड उपचारासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आता रुग्णालयातील रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे. एकेकाळी रूग्णालयात बेड मिळणे कठीण होते आता मात्र खाजगी आणि शासकीय रुग्णालयातही अनेक बेड रिकामे आहेत. हे वाचा- भय इथले संपत नाही! फक्त कोरोनाच नव्हे तर आणखी 5 आजारांचं थैमान, परिस्थिती गंभीर असे असले तरी व्यापारी वर्गात मात्र सध्या नाराजी पाहायला मिळते आहे. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू असून इतर सर्व बाजारपेठ मात्र बंद असल्याने व्यापाऱ्यांचे तसेच मजुरांचे हाल होताना दिसत आहे.1 जून नंतर पुन्हा लॉकडाऊन लागल्यास व्यापारी आणि मजूर वर्ग यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी गेल्या पंधरा दिवसातील कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू - 256 गेल्या आठवड्यातील एकूण रुग्ण संख्या- 4776, गेल्या आठवड्यातील मृत्यू- 99 शहरात एकूण रुग्णालय- 48 कोविड केअर सेंटर-15
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.