Home /News /national /

फक्त आधार क्रमांकाने करु शकता स्वत:च्या कंपनीची नोंदणी; 1 जुलैपासून नियमात मोठा बदल

फक्त आधार क्रमांकाने करु शकता स्वत:च्या कंपनीची नोंदणी; 1 जुलैपासून नियमात मोठा बदल

केंद्र सरकारने आता कोणत्याही भारतीय नागरिकाला आपली नवीन कंपनी सुरू करण्याची प्रक्रिया खूप सोपी केली आहे, असे नितिन गडकरी यांनी सांगितले

    नवी दिल्ली, 27 जून : केंद्र सरकारने आता कोणत्याही भारतीय नागरिकाला आपली नवीन कंपनी सुरू करण्याची प्रक्रिया खूप सोपी केली आहे. यासाठी केंद्र सरकारने सेल्फ-डिक्लरेशनच्या आधारे नवीन कंपनीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी नव्या नियमांना अधिसूचित केले आहे. हे नियम 1 जुलैपासून लागू होतील. नवीन नियमांनुसार कंपनी सुरू करण्यासाठी कागदपत्रे अपलोड करण्याची गरज राहणार नाही. आपल्याला फक्त आधार क्रमांक द्यावा लागेल आणि इतर सर्व माहिती सेल्फ-डिक्लरेशनच्या आधारे द्यावी लागेल. या प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, उद्यम नोंदणी प्रक्रिया (Udyam Registration Process)  आयकर आणि जीएसटी प्रणालीला एकमेकांशी जोडल्यामुळे ही नवीन यंत्रणा शक्य झाली आहे. यातून एखाद्या व्यक्तीने दिलेल्या सर्व माहितीची पॅन नंबर किंवा जीएसटीआयएनमध्ये दिलेल्या तपशीलांच्या आधारे पडताळणी केली जाईल. अधिकारी पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने कागदविरहित करण्यासाठी ही व्यवस्था सुरू केली आहे. या नव्या यंत्रणेअंतर्गत कोणतीही व्यक्ती फक्त आधार क्रमांक देऊन आपली कंपनी नोंदवू शकते. हे वाचा-कोरोनामुळे बस बंद; 3 रु. 46 पैशांचं कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याची 15 किमी पायपीट केंद्राने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता एक एमएसएमई एक एंटरप्राइझ म्हणून ओळखला जाईल. या नोंदणी प्रक्रियेस एंटरप्राइझ नोंदणी देखील म्हटले जाईल. एमएसएमई अंतर्गत केवळ प्लांट आणि मशीनरी किंवा उपकरणांमध्ये केलेली गुंतवणूक आणि व्यवसाय वर्गीकृत केले जातील. अधिसूचनेमध्ये असे स्पष्ट केले गेले आहे की, जेव्हा एखाद्या एंटरप्राइझची उलाढाल मोजली जाते तेव्हा वस्तू किंवा सेवा किंवा दोघांची निर्यात स्वतंत्र ठेवली जाईल. 1 जुलैपूर्वी पोर्टलची माहिती दिली जाईल अधिकृत निवेदनात म्हटले आहे की पोर्टलद्वारे ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. या पोर्टलची माहिती 1 जुलै 2020 पूर्वी देण्यात येईल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (एमएसएमई मंत्रालय) 1 जून 2020 रोजी गुंतवणूक आणि उलाढालीच्या आधारे एमएसएमई वर्गीकरणाच्या नवीन मानकांना अधिसूचित केले. 1 जुलै 2020 पासून हे नियम लागू होतील. या नियमांच्या आधारे मंत्रालयाने शुक्रवारी एक सविस्तर अधिसूचना जारी करुन उद्योजकांच्या नोंदणीची नवीन व्यवस्था केली आहे. आधार क्रमांक नसल्यास आपण अशा प्रकारे अर्ज करू शकता ज्यांच्याकडे अद्याप वैध आधार क्रमांक नाही, ते एकाच विंडो सिस्टमवर आधार नोंदणी विनंती अर्ज किंवा बँक फोटो पासबुक, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स देखील वापरू शकतात आणि नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. सिंगल विंडो सिस्टम अंतर्गत त्यांचा वैध आधार क्रमांक मिळाल्यानंतर नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की नवीन नोंदणी, वर्गीकरण आणि फॅसिलिटेशन अत्यंत सोपं झालं आहे.   संपादन - मीनल गांगुर्डे
    First published:

    Tags: Company, Gadkari nitin gadkari, Msme

    पुढील बातम्या