मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

त्या Video मध्ये नेमकी कोणती चूक? ST महिला कंडक्टरच्या अनेक रिल्स तुफान व्हायरल

त्या Video मध्ये नेमकी कोणती चूक? ST महिला कंडक्टरच्या अनेक रिल्स तुफान व्हायरल

एसटी महामंडळाच्या या निर्णयावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

एसटी महामंडळाच्या या निर्णयावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

एसटी महामंडळाच्या या निर्णयावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

उस्मानाबाद, 3 ऑक्टोबर : सध्या महाराष्ट्रभरात उस्मानाबादमधील एका महिला कंडक्टरची मोठी चर्चा सुरू आहे. महिलेला स्वतःचे व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करणे महागात पडले आहे. ही महिला कंडक्टर सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचं दिसून येत आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक रिल्स सोशल मीडियावर शेअर केले असून त्याला हजारोंमध्ये लाइक्स मिळाले आहे.

महिला कंडक्टरचे पती लष्करात काम करीत असल्याचं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिसून येत आहे. या व्हिडीओमधून एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या लेडी कंडक्टरला एसटी महामंडळाने निलंबित केलं आहे. मंगल गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये लेडी कंडक्टर म्हणून नोकरीस आहेत.

त्या वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलॉवर्स देखील आहेत. दरम्यान अनेकांनी त्या व्हिडीओमध्ये नेमकी कोणती चूक असल्याचा सवाल उपस्थित केला आहे.

स्वतःचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करणं लेडी कंडक्टरला पडले महागात, पाहा VIDEO

या व्हिडीओमधून एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या लेडी कंडक्टरला एसटी महामंडळाने निलंबित केलं आहे.

मंगल गिरी यांच्या एका व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावरचा त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे आणि अशा व्हिडिओमुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

एवढंच नाही तर त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकार्यालाही निलंबित करण्यात आलं आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या एसटी महामंडळाच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होतोय.

First published:

Tags: Government, ST