भारतानंतर आता अमेरिका देणार चीनला सगळ्यात मोठा धक्का, ट्रम्प यांचा निर्णय

भारतानंतर आता अमेरिका देणार चीनला सगळ्यात मोठा धक्का, ट्रम्प यांचा निर्णय

जगभर कोरोना (Coronavirus Pandemic) शिरकाव झाल्यापासून ट्रम्प हे चीनवर खूप चिडले आहेत. संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीचा सामना करत असतानाही चीन आपल्या खुरापती काही थांबवत नाही.

  • Share this:

वॉशिंग्टन, 01 ऑगस्ट : चीनच्या खुरापंतीमुळे भारताने धडा शिकवण्यासाठी चीनचे अनेक अॅप्स आणि कंपन्या बंद पाडल्या. यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला. पण चीनला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारतानंतर अमेरिकेनेही चीनला टार्गेट केलं आहे. अमेरिकेत चिनी अॅप Tik Tok आता कधीही बंदी घातली जाऊ शकते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) चिनी अ‍ॅप टिक टॉकवर बंदी घालण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यासाठी ते बर्‍याच पर्यायांवर विचार करत आहे.

जगभर कोरोना (Coronavirus Pandemic) शिरकाव झाल्यापासून ट्रम्प हे चीनवर खूप चिडले आहेत. संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीचा सामना करत असतानाही चीन आपल्या खुरापती काही थांबवत नाही. त्यामुळे भारताकडून चीनशी संबंधित कंपन्यांवर थेट बंदी घालण्यात आली. भारताने गेल्या आठवड्यात चीनच्या आणखी 47 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. भारत सरकारने याआधीही चीनमधील 59 अॅप्सवर (59 Apps Banned in India) बंदी घातली आहे. ज्यात टिक टॉकचा समावेश आहे.

मटका किंगचा मर्डर, ऑफिससमोरच गोळ्या झाडून केलं ठार

बंदी घातलेल्या अ‍ॅप्समध्ये मुख्यतः क्लोनिंग अॅप्सचा समावेश असतो. म्हणजे, आधी अ‍ॅप बन केले गेले. त्यानंतर या अ‍ॅप्समधून वापरकर्त्यांचा डेटा चोरीचा आरोप समोर आला. अशात गलवान खोऱ्यात मोठी चकमक झाली. यानंतर मात्र भारताने चिनी अ‍ॅप्सविरूद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यास सुरवात केली.

CNBC ने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प TikTok वर लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. यासंबंधीचा आदेश कधीही येऊ शकतो. आम्ही TikTok वर नजर ठेऊन आहोत. लवकरच यावर बंदी घातली जाऊ शकते. यावर आम्ही आणखी काही निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं ट्रम्प म्हणाले आहेत.

SSR Death: सुशांतच्या बहिणीची याप्रकरणी लक्ष घालण्याची पंतप्रधानांना विनंती

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या या माहितीनुसार, असं म्हटलं जात आहे की, बाईट डान्स टिकटॉकला विकू शकते आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीशी त्याबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा चीनसाठी आणखी एक मोठा धक्का असू शकतो.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 1, 2020, 9:39 AM IST

ताज्या बातम्या