अभिनेत्री हृता दुर्गुळेचे सलग दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मालिका आणि नाटकाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असलेल्या हृता आता सिनेमाच्या प्रमोशनचं शिवधनुष्य उचललं आहे.
हृताचा 22 जुलै रोजी अनन्या हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तिनं सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे.
'Swirling through promotions', असं म्हणतं हृतानं सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केल्याचं सांगितलं आहे.
प्रमोशनला सुरुवात करताच हृतानं इन्स्टाग्रामवर तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटो पाहून हृताचे चाहते तिच्या सौंदर्यावर घायाळ झालेत.
प्रमोशनसाठी हृतासाठी खास आऊटफिट डिझाइन करण्यात आले आहेत. फोटोमध्ये हृता सुंदर गुलाबी एथनिक पोशाखात पोज देताना दिसत आहे.
हृता फोटोंमध्ये अतिशय मनमोहक दिसत आहे. चाहते नेहमीप्रमामे तिच्या अदांवर चाहते फिदा झालेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.