मुंबई, 14 जून : मुळचा पटनाचा असणारा सुशांत सिंह हा चार बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता. सुरवातीपासूनच सुशांत खूप हुशार आणि इंजिनिअरिंगच्या ऑल इंडिया एग्जाम (AIEEE) मध्ये 7th वा क्रमांकसुद्धा मिळवला होता. सुशांतचं त्याच्या आई आणि बहिणीवर खूप प्रेम होतं. काही दिवसांआधीच त्याच्या बहीण आणि आईने या जगाचा निरोप घेतला. तेव्हापासून सुशांतचे वडील पटण्यात त्याच्या घरी एकटेच राहतात. सतत काढायचा आईची आठवण सुशांत आईचा खूप लाडका होता. त्यांच्या मृत्यूनंतर तो खूप दुःखी होता. त्याने इंस्टाग्रामवरील शेवटची पोस्टही आपल्या आईसाठी लिहली होती. 3 जून रोजी केलेल्या पोस्टमध्ये सुशांतने आपल्यासोबत आईचा फोटोही शेअर केला होता. करिअरमुळे होता अस्वस्थ ? सुशांतचं छोटसं करिअरमध्ये सगळं काही ठीक नव्हतं. उतार-चढाव सुरूच होते. त्याने केलेले अनेक सिनेमे फ्लॉप झाले. त्यामुळे तो अस्वस्थ होता. त्याचा ‘छिछोरे’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता आणि बॉक्स ऑफिसवरही त्याने चांगली कमाई केली होती. सुशांतचा आगामी ‘दिल बेचार’ हा चित्रपटही यंदा रिलीज होणार होता. उलटीच्या बहान्याने गाडीतून उतरली नववधू, नदीत उडी घेत संपवलं आयुष्य! आयुष्यात होती खूप निगेटिव्हीटी मोठ्या पडद्यावर महेंद्रसिंग धोणीची भूमिका साकारणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत सिंह राजपूतने अचानक एक्झिट घेतल्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सुशांतने आज दुपारी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याच्या घरी त्याचे मित्रही आले होते. मित्रांसोबत दिवस घालवण्यानंतर दुपारी तो आपल्या खोलीत गेला, तो परत आलाच नाही. घरातील नोकराला सुशांतने गळफास घेतल्याचं आढळून आलं. खासगी आयुष्यात होतं नैराश्य सुशांत सिंह राजपूतला सर्वात आधी ओळख मिळवून दिली आणि घराघरात पोहोचलं ते झी टीव्हीवरील पवित्र रिश्ता या मालिकेने. या मालिकेचं प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशा गारूड निर्माण झालं होतं. याच मालिकेत सुशांतसोबत प्रमुख भूमिकेत होती ती अभिनेत्री अंकिता लोखंडे. पवित्र रिश्ता या मालिकेतील मानव-अर्चना या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण त्यासोबत नंतर अंकिता आणि सुशांत हे दोघेही एकत्र आले होते. छोट्या पडद्यावर हिट ठरलेल्या या जोडीच्या अफेरची मोठी चर्चाही झाली. मात्र नंतरच्या काळात काही मतभेद झाले आणि सुशात-अंकिता यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुशांत बराच काळ खचलेल्या मानसिकतेत गेला होता. काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिची एका बिझमनसोबत एंगेजमेन्ट झाली आहे. संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.