Home /News /news /

उलटीच्या बहान्याने गाडीतून उतरली नववधू, नदीत उडी घेत संपवलं आयुष्य!

उलटीच्या बहान्याने गाडीतून उतरली नववधू, नदीत उडी घेत संपवलं आयुष्य!

नवरीच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मुलीच्या नातेवाईकांची परिस्थिती तर अतिशय वाईट आहे.

    सवाई (राजस्थान), 14 जून : लग्नसोहळा म्हणजे संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण असतं. पण अशात एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. जेव्हा एका नवविवाहित वधूने नदीत उडी मारून आत्महत्या केली. लग्न झाल्यानंतर सगळे घरी जात असताना नवरी मुलीने गाडी थांबवली आणि शेजारी असलेल्या नदीमध्ये उडी घेत आत्महत्या केली. तिच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मुलीच्या नातेवाईकांची परिस्थिती तर अतिशय वाईट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सवाई माधोपूरच्या अल्लापूर गावात एका युवतीचे मोठ्या थाटामाटात लग्न आवून दिलं. लग्नानंतर ही मुलगी पहिल्यांदाच तिच्या पतीसोबत सासरी जाण्यासाठी गाडीतून निघाली. अर्धा रस्तात पोहोचल्यानंतर ती उलटी येत असल्याच्या बहाण्याने गाडीच्या खाली उतरली आणि पुलावरून नदीत उडी घेतली. हे पाहताच नवऱ्या मुलाने मोठ्याने आरडाओरड केली आणि स्थानिकांना गोळा केलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने वधूचा खूप शोध सुरू केला. पण तिचा मृतदेह नदीत सापडला नाही. तिच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, मुलीचं एक दिवस आधी लग्न झालं होतं आणि लग्नादरम्यान ती खूप आनंदी होती. कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, मुलीने लग्नातही तिच्या पतीबरोबर भरपूर डान्स केला होता. त्यामुळे तिने असं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलीस अजूनही नववधूचा शोध घेत असून सगळीकडे चौकशी सुरू आहे. पण तिच्या अशा अकाली जाण्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या