पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेला ट्रकची भीषण धडक, जागेवरच सोडला जीव

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेला ट्रकची भीषण धडक, जागेवरच सोडला जीव

ट्रकला धडक बसल्यामुळे महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

  • Share this:

नागपूर, 19 एप्रिल : नागपुरात लॉकडाऊनमध्ये अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या कामावर निघालेल्या पेट्रोल पंप महिला कर्मचारीचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. लॉक डाउनच्या काळात पेट्रोल पंपवर आपल्या कामासाठी निघालेल्या एका पेट्रोल पंप महिला कर्मचारीटी ट्रकला जोरात धडक बसली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकला धडक बसल्यामुळे महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मृतक महिला यादव नगरच्या इंडियन ऑइल या पेट्रोल पंपवर कार्यरत होती. आज सकाळी नारी येथून ती आपल्या कामासाठी निघाली आणि टेका नाका परिसरजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा मृत्यू झाला.

सगळ्यात कमी वयाच्या कोरोना रुग्णाचा मृत्यू, 45 दिवसाच्या बाळाने सोडले प्राण

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, घटनास्थळावरून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालात पाठवण्यात आला आहे. तर या अपघाताची माहिती मृत महिलेच्या कुटुंबियांना देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

इंजिनिअरिंग नापास तरुण निघाला FB वर निशा जिंदल, पोलिसांनी अशी दिली शिक्षा

एकीकडे देशात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पण अत्यावश्यक सेवा मात्र सुरू असतील. मृत महिला आपल्या जीवाची काळजी न करता कामावर जायची. त्यामुळे त्यांच्या अशा मृत्यूमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दोन बायका असलेल्या पतीची लॉकडाऊनमध्ये अवस्था, प्रशासनाला फोनवर सांगितली कहाणी

संकलन आणि संपादन - रेणुका धायबर

Tags:
First Published: Apr 19, 2020 11:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading