जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 24 किमी अंतरावरचा फोटो टिपता येणार, 3200 मेगापिक्सेलची लेन्स असलेला सुपर डिजिटल कॅमेरा

24 किमी अंतरावरचा फोटो टिपता येणार, 3200 मेगापिक्सेलची लेन्स असलेला सुपर डिजिटल कॅमेरा

24 किमी अंतरावरचा फोटो टिपता येणार, 3200 मेगापिक्सेलची लेन्स असलेला सुपर डिजिटल कॅमेरा

या कॅमेराची क्षमता खूप जबरदस्त असून, अगदी 24 किलोमीटर अंतरावर ठेवलेला चेंडूही हा कॅमेरा अगदी स्पष्टपणे टिपू शकतो.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : विशिष्ट अंतरावरचं दृश्य स्पष्टपणे टिपण्यासाठी खास फीचर्स, तसंच आधुनिक लेन्स असलेले कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत. प्रगत तंत्रज्ञानामुळे कॅमेरामधली फीचर्स सातत्याने बदल आहेत. याच पार्श्वभूमीवर आता एक नवीन माहिती समोर आली आहे. अमेरिकी शास्त्रज्ञांनी जगातला सर्वांत मोठा डिजिटल कॅमेरा तयार केला आहे. हा कॅमेरा तब्बल 3200 मेगापिक्सेलचा आहे. या कॅमेरामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स देण्यात आली आहेत. हा कॅमेरा खूपच पॉवरफुल असून, 24 किलोमीटर अंतरावर ठेवलेला चेंडूदेखील तो अगदी सहज आणि स्पष्टपणे टिपू शकतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अमेरिकी शास्त्रज्ञांनी अधिकृतपणे जगातला सर्वांत मोठा डिजिटल कॅमेरा सादर केला आहे. 3200 मेगापिक्सेलचा हा कॅमेरा अमेरिकेत कॅलिफोर्नियामधल्या मेनला पार्कमध्ये ठेवण्यात आला आहे. या कॅमेराची क्षमता खूप जबरदस्त असून, अगदी 24 किलोमीटर अंतरावर ठेवलेला चेंडूही हा कॅमेरा अगदी स्पष्टपणे टिपू शकतो. हा कॅमेरा चिलीतल्या रुबिन वेधशाळेत बसवला जाणार आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, `या कॅमेराद्वारे टिपली जाणारी छायाचित्रं 378 4K अल्ट्रा हाय डेफिनेशिनची असतील. हा कॅमेरा अधिक चांगला बनावा यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील असून, कॅमेरात रेफ्रिजरेशन सिस्टीम इन्स्टॉल केली जाणार आहे.` `या कॅमेराच्या मदतीने विश्वातल्या अनेक रहस्यांची उकल होऊ शकते. अंतराळाविषयीची रहस्यं उजेडात येऊ शकतात. डार्क मॅटर आणि डार्क एनर्जीशी निगडीत नवीन माहिती मिळू शकते,` असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. वेधशाळेचे संचालक स्टिव्हरन कान म्हणाले, `या कॅमेराची निर्मिती हे एक मोठं यश आहे. याला लार्ज सिनोप्टिक सर्व्हे टेलिस्कोप अर्थात LSST असं नाव दिलं गेलं आहे.` तब्बल 108MP कॅमेरा अन् दमदार फीचर्ससह स्मार्टफोन, वाचा डिटेल्स एका अहवालानुसार, या कॅमेराचा आकार एका लहान एसयूव्हीसारखा आहे. त्याचं वजन 2800 किलो आहे. हा कॅमेरा लेन्समधलं प्रतिबिंब विद्युत सिग्नलमध्ये रूपांतरित करतो आणि स्पष्ट प्रतिमा तयार करतो. यासाठी त्यातले 189 सीसीडी सेन्सर्स मदत करतात. या कॅमेराच्या मदतीने अंतराळातली छायाचित्रं टिपली जातील. या कॅमेराचा वापर अंतराळ मोहिमेसाठी केला जाईल. 3200 मेगापिक्सेल लेन्सच्या मदतीनं रात्रीच्या वेळी आकाशातले फोटो टिपले जातील. रात्रीच्या वेळी आकाशात होणारे बदल याद्वारे सहजपणे टिपता येतील. याशिवाय तारे आणि आकाशगंगांची नेमकी संख्या या कॅमेऱ्यामुळे कळू शकेल. `डेली मेल`च्या वृत्तानुसार, या कॅमेराची लेन्स पाच फुटांपेक्षा मोठी असल्याने हाय रिझोल्युशनचे फोटोज तो सहजपणे कॅप्चर करील.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: camera , digital
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात