सिंधुदुर्ग 1 जुलै: सिंधुदुर्गातल्या एका खेड्यातल्या मालवणी तरुणाने वयाच्या 23 व्या वर्षी चीन मध्ये जाउन चीनी भाषा शिकून , बॉम्बे गिल्स नावाचं रेस्टॉरंट सुरु केलं आणि तिथे कसा जम बसवला. शांतिकुमार धुरी आणि त्यांचं कुटुंब सध्या सिंधुदुर्गातल्या पिंगुळी या आपल्या गावी आहे. शांतिकुमार हे चीन मधल्या गॉन्झो प्रांतातल्या बॉम्बे ग्रिल्स या रेस्टॉरंटचे मालक आहेत. दरवर्षीप्रमाणे ते पंधरा जानेवारीला आपल्या पिंगुळी या गावी आले आणि चीन मध्ये कोरोना विषाणू आउटब्रेक झाला. धुरींचं रेस्टॉरंट असलेला गॉन्झो प्रांत वुहानपासून एक हजार किलोमीटरवर. पण तरीही चीन लॉकडाउन झाल्यामुळे आणि हल्ली भारत चीन तणाव वाढल्यामुळे शांतीकुमार पिंगुळी या आपल्या गावीच अडकून पडले आहेत. वडापाव, पंजाबी आणि दक्षिणात्य पदार्थ आणि अशा अनेक गोष्टींची आवड त्यांनी तिथल्या माणसांना लावली आहे.
शांतीकुमार सिंधुदुर्गातून नोकरीसाठी मुंबईला गेलेल्या शांतीकुमार यांनी शेफचं प्रशिक्षण घेतलं. आणि नंतर आपल्या एका मित्राच्या ओळखीने त्यानी चीन गाठलं. मित्राच्या हॉटेल मध्ये शेफ म्हणून काम करताना त्यानीही ठरवलं की आपलंही रेस्टॉरन्ट चीन मध्ये असलं पाहिजे. म्हणून मग काही वर्षानी त्यानी बॉम्बे ग्रिल्स हे रेसटॉरंट सुरु केलं ते आजतागायत सुरु आहे .
कशी आत्मसात केली चीनी भाषा ? शांतिकुमार यांच्यासमोर मुख्य अडचण होती ती भाषेची . चीनी भाषा त्याना जराही अवगत नव्हती. त्यामुळे चीनी बाजारपेठात भाजी किंवा इतर वस्तू खरेदी करताना ते खाणखुणा करुनच आपली गरज चीनी व्यापाऱ्याना समजावून सांगायचे. पण रेस्टॉरट चालवायचं म्हणजे चीनी भाषा आलीच पाहिजे! म्हणून मग त्यानी आपल्या खिशात एक डायरी बाळ्गली.
पंतप्रधान मोदी यांनी सोडलं 'हे' चायनीज APP, दोन सोडून सगळ्या पोस्ट केल्या Delete
आणि कुठल्या वस्तूला चीनी भाषेत काय म्हणतात, त्या वस्तूच्या नावाचा उच्चार कस केल जातो याबाबतचे तपशील ते आपल्या डायरीत लिहून ठेउ लागले. आणि हळुहळु कामापुरती चीनी भाषा त्याना येउ लागली आता तर ते उत्तम चीनी बोलतात.
महाराष्ट्राची संस्कृती चीन मध्ये !
चीन मध्ये गेलेल्या शांतीकुमार यानी मग गॉन्झो प्रांतात गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. भारतीयांचा समावेश असलेलं हे मंडळ दरवर्षीचा गणेशोत्सव करतं. केवळ गणेशोत्सवच नाही तर गोकुळाष्टमी , दिवाळी , नवरात्र असे अनेक सण तिथे केले जातात. शांतिकुमार यांच्या या उपक्रमामुळे तिथे अनेक भारतीय एकत्र येउन आपापल्या परंपरा साजऱ्या करतात.
काय आहे सध्या चीन मधली स्थिती शांतिकुमार म्हणतात की चीनचे अनेक भाग कोरोनामुक्त झाले अहेत . लॉक्डाउनची अत्यंत कडक अंमलबजावणी आणि चीनी नागरिकानी पाळलेली शिस्त यामुळे हे शक्य होतय. शंतिकुमार यांच वास्तव्य आणि व्यवसाय असलेल्या गॉन्झो आणि आसपासच्या भागात तर सध्या एकही कोरोनाचा रुगण नाहीय. तिथे मास्क वापरणं बंद झालय.
सध्याचा भारत चीन तणाव निवळला तर येत्या दोन तीन महिन्यानंतर आपल्याला पु न्हा आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी जाता येईल असा विश्वास शांतीकुमार याना आहे. त्यांच्या रेस्टॉरंट्ला बेस्ट इंडियन रेस्टॉरंट म्हणून आत्तापर्यंत पाच वेळा गौरवण्यात आलय. भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यानी आणि कलाकारानी शांतीकुमार यांच्या चीन मधल्या या हॉटेलचा पाहुणचार घेतलाय.
भारत सरकारने चीनचे 59 मोबाईल ॲप बंद करण्याचा निर्णय घेतला तो योग्यच आहे असं धुरी यांचं म्हणणं आहे. हॉटेलसोबतच ट्रेडिंग व्यवसायात असणाऱ्या शांतीकुमार याना यामुळे व्यावसायिक फटका जरुर बसणार आहे. तरीही हा निर्णय त्याना योग्य वाटतोय. हळुहळु परिस्थिती सुधारेल आणि तीन महिन्यात कोरोनावार लस सुध्दा मार्केट मध्ये येईल असा विश्वास धुरी याना वाटतोय.
संपादन - अजय कौटिकवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.