लखनऊ, 18 जानेवारी : लखनऊमध्ये एका भामट्या नवरीने लग्नापूर्वी होणाऱ्या नवरदेवाला लाखो रुपयांचा चुना लावला आणि फरार झाली. 16 डिसेंबर रोजी तरुणाचं लग्न होणार होतं. मात्र त्यापूर्वीच तरुणी त्याला लुटून फरार झाली आहे. मनोज अग्रवाल नावाच्या तरुणाची मेट्रोमोनियल वेबसाइट जीवन साथी डॉट कॉमच्या माध्यमातून एका तरुणीसोबत ओळख झाली होती. ज्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (girl made a purchase of Rs 6 lakh from the man before marriage) लखनऊमध्ये राहणाऱ्या मनोज अग्रवालने लग्नासाठी जीवन साथी डॉट कॉमवर आपली प्रोफाइल तयार केली होती. यादरम्यान 15 ऑगस्ट रोजी प्रियांका सिंह नावाच्या मुलीची त्याला रिक्वेस्ट आली. त्यानंतर दोघांमध्ये संवाद होऊ लागला. मनोजने दिलेल्या माहितीनुसार तरुणीने त्याला सांगितलं की, ती बिहारची राहणारी आहे. आणि तिच्या आई-वडिलांचं निधन झालं आहे ती आपल्या मावशीसोबत राहते आणि दिल्लीत शिक्षण घेत आहे.
कथित स्वरुपात मनोजच्या घरातल्यांनी आणि प्रियांकाच्या मावशीने चर्चा करुन दोघांचं लग्न ठरवलं. यादरम्यान तरुणीने मनोजला सांगितलं की, यूपीएससीची तयारी करीत आहे आणि लवकरच ती पासही होईल. मनोजने दिलेल्या माहितीनुसार या बहाण्याने तरुणीने पैसे मागण्यास सुरुवात केली. मनोजने सांगितलं की, तरुणी अभ्यासाच्या नावाखाली कधी 10 हजार, कधी 20 हजार तर कधी 50000 रुपये मागत होती. आपली होणारी पत्नी म्हणून तो तिला पैसे देत राहिला. अशा प्रकारे तरुणाने घरासाठी जमा केलेले तब्बल 6 लाख रुपये तिच्यावर उडवले.
हे ही वाचा-एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या जाऊबाई जोरात! धाकटीपेक्षा मोठीच ठरली वरचढ
गेल्या 6 महिन्यांपासून दोघांमध्ये व्हॉट्सअॅप चॅटिंग सुरू होती. दोघं नियमित भेटतही होते. यादरम्यान 16 डिसेंबर रोजी लग्नाची तारीख ठरवण्यात आली. तरुण खूप खूश होता, आणि आपल्या लग्नाची तयारी करू लागला. तरुणी जेव्हा त्याला भेटायला लखनऊ पोहोचली, त्यावेळी तिच्या येण्या-जाण्याचं फ्लाइट तिकिटाचे पैसेही मनोजनेच दिले. इतकच नाही तर मनोजने मॉलमध्ये तिच्यासाठी तब्बल 2 लाखांची शॉपिंग केली.
त्यानंतर कथित स्वरुपात आरोपी प्रियांका सिंह शेवटी हैद्राबादला जात असल्याचं सांगून त्याला चूना लावून फरार झाली. मनोजने जेव्हा प्रियांकाने दिलेले आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वोटर कार्डचा तपास केला तेव्हा ते बनावटी असल्याचं समोर आलं. (girl made a purchase of Rs 6 lakh from the man before marriage) आजतकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
जेव्हा पीडित आरोपी प्रियांकाने दिलेल्या पत्त्यावर बिहार आणि दिल्लीत तपास करण्यासाठी पोहोचला तेव्हा तेदेखील बनावटी होते. त्यानंतर तरुणाला आपल्यासोबत फ्रॉड झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. लग्नापूर्वीच प्रियांका नावाची तरुणी मनोज नावाच्या तरुणाची लूट करुन फरार झाली होती. यानंतर पीडित तरुणाने हजरतगंज पोलीस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Wife and husband