मुंबई, 18 जानेवारी : ग्रामीण महाराष्ट्रात सोमवारी सकाळपासून निवडणुकीचे वारे चांगले रंगले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीचे निकाल सकाळपासून जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे. त्यात काही निवडणुका भावबंदकीत लढवल्या गेल्या. काही पक्षीय राजकारणामुळे चर्चिल्या गेल्या तर काही अन्य कारणाने. धुळे जिल्ह्यातल्या एका गावात दोन सख्ख्या जावाच एकमेंकींविरोधात उभ्या ठाकल्या होत्या. राज्यात जवळपास 12,711 ग्रामपंचायतींचे सभासद आजच्या निकालानंतर ठरतील. 34 जिल्ह्यांमधल्या 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. पण त्यातल्या 1523 ग्रामपंचायतींचे निकाल बिनविरोध झाल्याने 12,711 पंचायतींसाठी मतदान झालं होतं. मोठ्या जाऊबाई जोरात धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या दहिवद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एक वेगळाच रंग पाहायला मिळाला. या वेळी निवडणुकीच्या रिंगणात दोन सख्ख्या जावा एकमेकींविरोधात आहेत. दहिवदमध्ये मोठी जाऊ आशाबाई पाटील यांच्या विरोधात वृषाली पाटील यांच्यात लढत होती. त्यात आशा पाटील विजयी झाल्या आहेत. त्यांना 364 मतं मिळाली. आशा पाटील या माजी उपसरपंच रवींद्र पाटील यांची पत्नी आहेत. आता त्या सरपंचपदाच्या मानकरी ठरतील. दुपारी 4 वाजेपर्यंतचा निकालाचा कल.. शिवसेना 1007 भाजप 992 राष्ट्रवादी 891 काँग्रेस 658 मनसे 15 अन्य 927
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







