कोलकाता, 06 मे : पश्चिम बंगाल (West Bengal Violence) मध्ये 2 मे रोजी लागलेल्या निकालांनंतर राज्याच्या विविध भागांमध्ये हिंसाचार सुरू झालाय. या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप (BJP) तृणमूल कांग्रेसवर (TMC) हल्ल्याचा आरोप करत आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गुरुवारी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. भाजपचे नेते जनादेश स्वीकारायला तयार नसल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. मृतांच्या कुटुंबीयांना ममता यांनी 2 लाखांची नुकसान भरपाई देणार असल्याचं जाहीर केलं. (वाचा - Youtube चं नवं फीचर; आता युट्युबवर आपल्या भाषेत सर्च करता येणार Video ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगाच्या ताब्यात कायदेव्यवस्था असताना 16 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी भाजप आणि तृणमुलचे अर्धे अर्धे कार्यकर्ते होते तर एक कार्यकर्ता संयुक्त मोर्चाचा होता, अशी माहिती ममता यांनी दिली. ममता यांनी यावेळी भाजपवर हल्लाबोल देखिल केला. भाजप नेते इथं फिरत आहेत. ते लोकांना चिथावणी देत आहेत. नवं सरकार स्थापन होऊन अद्याप 24 तासही झालेले नाहीत. लगेच भाजपनं पत्र पाठवणं, पथकं पाठवणं आणि नेत्यांना पाठवायला सुरुवात केली आहे. ममता म्हणाल्या की, खरं म्हणजे भाजप जनादेश मान्य करायला तयार नाही. माझी त्यांना विनंती आहे की, त्यांना जनादेश मान्य करावा. (वाचा- शेवटचा पुरावाही डॉक्टरनं संपवला; आता ACP दिव्या कशी पकडणार देवमाणूस? ) ममता बॅनर्जी यांनी कोरोनाच्या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारला घेरलं. ममता म्हणाल्या, ‘पीएम केअर्स निधी कुठं आहे? ते लोकांचा जीव का धोक्यात घालत आहेत. त्यांच्या नेत्यांनी इतर ठिकाणी फिरण्याऐवजी रुग्णालयांना भेटी द्यायला हव्या. त्यांचे नेते इथं येऊन कोरोना पसरवत आहेत, असं ममता म्हणाल्या. लसीकरणाबाबत अद्याप मला नरेंद्र मोदींकडून काहीही उत्तर मिळालेलं नाही. मोफत लसीकरणासाठी ते लोक 30 हजार कोटींची तरतूद का करत नाहीत. उलट नवीन संसद सभागृह आणि मूर्त्यांसाठी 20 हजार कोटी खर्च केले जात आहेत. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, कोरोनाच्या संकटात नेते इथं येत आहेत. ते येतात चहा पितात आणि निघून जातात. आता जर नेत्यांना इथं यायचं असेल तर त्यांना निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट सोबत आणावा लागेल. स्पेशल फ्लाईटसाठीही हा नियम असेल. नियम सर्वांसाठी सारखे असतील. कोरोना वाढण्याचं कारण म्हणजे भाजप नेते इथं वारंवार येत आहेत. भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी नुकतीच बंगालला भेट दिली होती. हिंसाचारात भाजपच्या 14 कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा दावा त्यांनी केला होता. तसंच एक लाख लोकांनी घरं सोडून पलायन केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यावर ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.