Home /News /news /

109 वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनाविरोधात बांधला चंग, काम पाहून तुम्ही व्हाल दंग!

109 वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनाविरोधात बांधला चंग, काम पाहून तुम्ही व्हाल दंग!

या आजीबाईंना एक 105 वर्षाचा भाऊ आणि दोन बहिणी आहे. त्यांना तब्बल 49 नातवंड आणि परतवंड आहेत.

भिवंडी, 10 जून : संपूर्ण जगासह आपल्या देशात हाहाकार माजवलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी  सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहे. भिवंडी तालुक्यातील दुघाड येथील 109 वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर नवी लढाई सुरू केली आहे. या आजीबाई  कोरोनाच्या विषाणूपासून वाचण्यासाठी नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी लिंबाचा पाला, काळी मिरी, दालचिनी, सुंठ आदीचा काढा करून देत आहे. भिवंडी तालुक्यातील दुघाड गावातील राहणाऱ्या चांगुणाबाई  वामन जाधव 109 वर्षाच्या आजीबाई यांचे माहेर भिवंडी तालुक्यातील वेढे गाव असून त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1910 रोजी झाला अशी नोंद त्यांच्या आधारकार्ड वर आणि त्यांच्या शाळेत सुद्धा आहे. त्या दुसरी शिकल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे, पहिल्यापासून शेती कामाची आवड आहे. त्याच प्रमाणे निरोगी राहण्याचे रहस्य पाहिले असता त्या पहिल्यापासून रोज गरम पाणी पितात आणि सकाळी लिंबाच्या पानाचा काढा, काळी मिरी, सुंठ, दालचिनी याचे नियमित सेवन करतात. त्याच प्रमाणे नातेवाईक असो किंवा गावातील नागरिक यांना पाहिल्यापासून ताप, सर्दी, खोकला, अशा विविध आजारावर घरगुती औषध बनवून देतात. त्यामुळे आजपर्यंत त्या दवाखान्यात गेल्या नाहीत. आजही ह्या आजीबाई ठणठणीत आहेत. त्यांचा आवाज ही खणखणीत तर नजर सुद्धा चांगली आहे. त्या आजही गावात फेरफटका मारत आहे. या आजीबाईंना एक 105 वर्षाचा भाऊ आणि दोन बहिणी आहे.त्यांना 3 मुले त्यामधील एका मुलाचे निधन झाले तर 2 मुली त्यामधील एका मुलीचेही निधन झाले आहे. त्यांना तब्बल 49 नातवंड आणि परतवंड आहेत. या आजीबाईंच्या कामाची दखल घेऊन गेल्यावर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने  त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला.  या आजीबाईंनी इंग्रजांचा काळ सुद्धा पाहिला असून तेव्हा फक्त  एकच भिवंडी-वाडा एसटी बस होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भिवंडीत पहिली सभा झाली होती. या सभेच्या आजीबाई साक्षीदार आहे. त्या स्वत: या  सभेला आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या. बाबासाहेबांच्या निधनानंतर दादर येथील चौपाटीला सुद्धा गेल्या असल्याचे सांगतात. महत्वाची बाब म्हणजे, त्यांचा मुलगा सुभाष जाधव यांना ग्रामीण भागात राहून सुद्धा चांगल्या पद्धतीने  शिक्षण देऊन कस्टम अधिकारी बनवले आहे, ते आता निवृत्त झाले आहेत. सध्या कोरोनाच्या विषाणूशी लढा देण्यासाठी आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली राहावी यासाठी या आजीबाई गेल्या अडीच महिन्यापासून त्यांचे नातेवाईक असो किंवा गावातील नागरिक  यांना स्वतः पाट्यावर वाटून काढा बनवून देत आहे. त्यामुळे या 109 वर्षाच्या आजीबाईंकडे काढा घेण्यासाठी भिवंडीकर चांगली गर्दी करत आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Maharashtra

पुढील बातम्या