02 एप्रिल : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज (बुधवारी) रायबरेलीमधून आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी रायबरेलीमधून जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांचं रायबरेलीमध्ये जंगी स्वागत करण्यता आलं.
अर्ज भरण्याआधी एका रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळला. लोकांच्या आग्रहास्तव सोनियांना अनेक ठिकाणी आपली गाडी थांबवावी लागली. विशेष ज्या गाडीत सोनिया गांधी होत्या त्या गाडीचे सारथी राहुल गांधी बनले होते.
जाहिरात
लोकांनी मोठ्या उत्साहाने सोनिया गांधींचं स्वागत केलं. सोनियांच्या रॅलीवर लोकांनाी गुलाबाच्या पाकळ्या उधळून स्वागत केलं. लोकांना आवरताना सोनियांच्या सुरक्षा रक्षकांची चांगलीच धांदल उडाली. अर्ज भरण्यापूर्वी सोनिया गांधी यांनी हवनसुद्धा केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.