जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / सावकार तुपाशी, शेतकरी उपाशी !

सावकार तुपाशी, शेतकरी उपाशी !

सावकार तुपाशी, शेतकरी उपाशी !

28 सप्टेंबर : राज्यभरात कमी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. विदर्भात अपुर्‍या पावसाअभावी शेतकर्‍यांचे हाल होत आहे. अशा सरकारकडून अजूनही कोणतीही मदत तर जाहीर झाली पण बँकांकडून शेतकर्‍यांऐवजी सावकारांना मदत केली जात आहे. सावकरांना तब्बल 171 कोटींची मदत देण्यास सुरूवात झालीये. विदर्भातला शेतकरी अपुर्‍या पावसामुळे अडचणीत आला असतानाच कर्जाची वसुली बँकाकडून सुरूच आहे. त्यात शेतकरी आणि जिल्हा बँका डबघाईस आल्या आहेत. अशी परिस्थिती असतांना सरकारने शेतकर्‍यांना मदत करण्याऐवजी सावकारांना तब्बल 171 कोटी रुपये मदत द्यायला सुरुवात केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

      vidarbha savkar  28 सप्टेंबर : राज्यभरात कमी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. विदर्भात अपुर्‍या पावसाअभावी शेतकर्‍यांचे हाल होत आहे. अशा सरकारकडून अजूनही कोणतीही मदत तर जाहीर झाली पण बँकांकडून शेतकर्‍यांऐवजी सावकारांना मदत केली जात आहे. सावकरांना तब्बल 171 कोटींची मदत देण्यास सुरूवात झालीये. विदर्भातला शेतकरी अपुर्‍या पावसामुळे अडचणीत आला असतानाच कर्जाची वसुली बँकाकडून सुरूच आहे. त्यात शेतकरी आणि जिल्हा बँका डबघाईस आल्या आहेत. अशी परिस्थिती असतांना सरकारने शेतकर्‍यांना मदत करण्याऐवजी सावकारांना तब्बल 171 कोटी रुपये मदत द्यायला सुरुवात केली आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात सावकारांकडून शेतकर्‍यांनी घेतलेले दोन कोटी रुपये सावकारांच्या खात्यात जमा केले आहे. तर सरकार तब्बल सहा कोटी रुपये नागपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत सावकारांना देणार आहे. पण ग्रामीण भागात नोंदणीकृत सावकार नाही शहरातील नोंदणीकृत सावकारांना कर्ज देण्याची मुभा नाही. त्यामुळे सावकारांना मदत देण्याची घाई का असा सवाल शेतकरी नेत विचारत आहेत. सरकारचा अजब कारभार - खाजगी सावकारांकडे कर्ज घेणार्‍यांच्या व्यवसायाचा तपशील नाही - शहरातील नोंदणीकृत सावकारांना शेतीसाठी कर्ज देण्याची मुभा नाही - सहकार विभागाकडून 12 ते 13 टक्के व्याजानं कर्ज देण्याचा नियम - खाजगी सावकारांचा 18 टक्के व्याजानं कर्ज दिल्याचा दावा - 171 कोटी खाजगी सावकारांच्या खात्यात जमा होणार - बोगस सावकारांना मदत होण्याची भीती - ग्रामीण भागात नोंदणीकृत सावकारच नाही  

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात