जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / श्रीकर परदेशी यांची अखेर बदली

श्रीकर परदेशी यांची अखेर बदली

श्रीकर परदेशी यांची अखेर बदली

07 फेब्रुवारी : पिपंरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांची अखेर बदली झालीय. त्यांची मुद्रांक शुल्क विभागात इन्स्पेक्टर जनरल पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलीय. स्वत: परदेशी यांनी या बातमीला दुजोरा दिलाय. तर परदेशींच्या जागी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांची नियुक्ती करण्यात आलीय. राजकीय नेत्यांना न आवडणारे निर्णय घेतल्याने त्यांची बदली केली जाईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू होती. जाहिरात याविरोधात पुण्यातल्या सामाजिक संघटनाही एकत्र आल्या होत्या. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परदेशींच्या बदलीचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं सांगितलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

    9-8 pardeshi 54 07 फेब्रुवारी : पिपंरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांची अखेर बदली झालीय. त्यांची मुद्रांक शुल्क विभागात इन्स्पेक्टर जनरल पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलीय. स्वत: परदेशी यांनी या बातमीला दुजोरा दिलाय.

    तर परदेशींच्या जागी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांची नियुक्ती करण्यात आलीय. राजकीय नेत्यांना न आवडणारे निर्णय घेतल्याने त्यांची बदली केली जाईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू होती.

    जाहिरात

    याविरोधात पुण्यातल्या सामाजिक संघटनाही एकत्र आल्या होत्या. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परदेशींच्या बदलीचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं सांगितलं होतं. तरीही अखेर आज त्यांची बदली करण्यात आली आहे. श्रीकर परदेशींची कारकीर्द

    • - नांदेडमध्ये कॉपीमुक्त अभियानाची यशस्वी अंमलबजावणी
    • - पटपडताळणीचं काम चोखपणे पार पाडलं
    • - पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम
    • - पीसीएमसी अधिकार्‍यांचीही अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केली
    • - हे काम करताना त्यांना आतापर्यंत 7 वेळा धमक्या आलेल्या आहेत.
    • - प्रचंड राजकीय दबाव असतानाही निडरपणे ही मोहीम त्यांनी सुरू ठेवलीय.
    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात