जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / शनिशिंगणापूरचा प्रश्न चर्चेने सोडवा, स्थानिक प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचे आदेश

शनिशिंगणापूरचा प्रश्न चर्चेने सोडवा, स्थानिक प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचे आदेश

शनिशिंगणापूरचा प्रश्न चर्चेने सोडवा, स्थानिक प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई - 26 जानेवारी : ईश्वराच्या दर्शनासाठी भेदभाव ही आमची संस्कृती नाही. मंदिर प्रशासनाने पुढाकार घेवून चर्चेच्या माध्यमातून असे प्रश्न सोडवले पाहिजेत असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पुण्यातील भुमाता ब्रिगेडकडून आज शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर जाण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर गृहराज्यमंत्री राम शिंदेंनी गावकर्‍यांच्या विरोधात जायचं टाळलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी या वादावर आपलं मौन सोडत, स्पष्टपणे महिलांची बाजू घेतलीये. जाहिरात भारतीय परंपरेत आणि हिंदू धर्मात स्त्रियांना उपासनेचे स्वातंत्र्य नेहमीच राहिले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :
    345508-devendra-fadnavis-farmer

    मुंबई - 26 जानेवारी : ईश्वराच्या दर्शनासाठी भेदभाव ही आमची संस्कृती नाही. मंदिर प्रशासनाने पुढाकार घेवून चर्चेच्या माध्यमातून असे प्रश्न सोडवले पाहिजेत असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

    पुण्यातील भुमाता ब्रिगेडकडून आज शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर जाण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर गृहराज्यमंत्री राम शिंदेंनी गावकर्‍यांच्या विरोधात जायचं टाळलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी या वादावर आपलं मौन सोडत, स्पष्टपणे महिलांची बाजू घेतलीये.

    जाहिरात

    भारतीय परंपरेत आणि हिंदू धर्मात स्त्रियांना उपासनेचे स्वातंत्र्य नेहमीच राहिले आहे. प्रथा परंपरांमध्ये कालसापेक्ष बदल हीच आमची संस्कृती आहे. ईश्वराच्या दर्शनासाठी भेदभाव ही आमची संस्कृती नाही. मंदिर प्रशासनाने पुढाकार घेऊन चर्चेच्या माध्यमातून असे प्रश्न सोडवले पाहिजेत. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांना सूचना दिल्या आहेत की संघर्ष टाळून संवाद प्रस्थापित करावा. समाजातील अग्रजांनी त्यामध्ये पुढाकार घ्यावा, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    तर महाराष्ट्र सरकार शनी शिंगणापूर मंदिर अधिकारी आणि महिला कार्यकर्ते यांच्याशी बोलणं सुरू आहे. लवकरच यावर तोडगा निघेल असं राज्यमंत्री राम शिंदे म्हणाले.

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात