जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / शक्ती मिल गँगरेप प्रकरणात तीन आरोपीं कलम 376 (ई)अंतर्गत दोषी

शक्ती मिल गँगरेप प्रकरणात तीन आरोपीं कलम 376 (ई)अंतर्गत दोषी

शक्ती मिल गँगरेप प्रकरणात तीन आरोपीं कलम 376 (ई)अंतर्गत दोषी

03 एप्रिल : मुंबईतल्या शक्ती मिल परिसरात फोटोजर्नलिस्टवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी सेशन्स कोर्टानं कासिम बंगाली, मोहम्मद सलीम आणि विजय जाधव या तिघांना कलम 376 (ई) अंतर्गत दोषी ठरवलं आहे. महालक्ष्मी येथील शक्ती मिल येथे २२ ऑगस्ट २०१3 मध्ये फोटोजर्नलिस्टवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्याच आरोपींनी जुलै महिन्यात एका टेलिफोन ऑपरेटरवरही बलात्कार केला होता. त्याप्रकरणी न्यायालयाने चार जणांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावली होती. जाहिरात या गुन्ह्यातील तीन आरोपींचा फोटोजर्नलिस्टवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातही सहभाग होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

    shakti mill03 एप्रिल :  मुंबईतल्या शक्ती मिल परिसरात फोटोजर्नलिस्टवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी सेशन्स कोर्टानं कासिम बंगाली, मोहम्मद सलीम आणि विजय जाधव या तिघांना कलम 376 (ई) अंतर्गत दोषी ठरवलं आहे.

    महालक्ष्मी येथील शक्ती मिल येथे २२ ऑगस्ट २०१3 मध्ये फोटोजर्नलिस्टवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्याच आरोपींनी जुलै महिन्यात एका टेलिफोन ऑपरेटरवरही बलात्कार केला होता. त्याप्रकरणी न्यायालयाने चार जणांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावली होती.

    जाहिरात

    या गुन्ह्यातील तीन आरोपींचा फोटोजर्नलिस्टवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातही सहभाग होता. त्यामुळे तिघांवर कलम 376 ई अंतर्गत सुनावणी झाली. बलात्काराचा गुन्हा पुन्हा करणार्‍यांसाठी हे कलम वापरण्यात येतं.

    या कलमाच्या तरतुदीनुसार कासिम बंगाली, मोहम्मद सलीम आणि विजय जाधव या तिघांना फाशीची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे याप्रकरणातील दोषींना आता काय शिक्षा टोठावली जाते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात