24 मार्च : मुंबईत महालक्ष्मी इथं शक्ती मिल फोटोजर्नलिस्ट गँगरेप प्रकरणातील नराधमांची शिक्षा उद्यावर ढकलण्यात आलीय. कोर्टाने आरोपींविरोधात नव्याने आरोप निश्चित केले आहेत.
याआधी शुक्रवारी टेलिफोन ऑपरेटरवरच्या गँगरेप प्रकरणात 4 आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली होती. त्यापैकी तीन आरोपींना फोटोजर्नलिस्ट बलात्कार प्रकरणीही दोषी ठरवण्यात आलंय. जुलै आणि ऑगस्ट 2013 मध्ये शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये झालेल्या दोन गँगरेप प्रकरणी एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली होती.
त्यापैकी विजय जाधव, मोहम्मद कासिम हाफिज शेख आणि मोहम्मद अन्सारी यांना दोन्ही प्रकरणात दोषी ठरवण्यात आलंय. त्यामुळे त्यांना सराईत गुन्हेगार मानावं, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली. तर या दोन्ही प्रकरणातल्या दोन अल्पवयीन आरोपींचा खटला ज्युवेनाईल कोर्टात सुरू आहे. शक्ती मिल घटनाक्रम - 22 ऑगस्ट 2013 - शक्ती मिल फोटोजर्नलिस्टवर सामूहिक बलात्कार - 19 सप्टेंबर 2013 - किल्ला कोर्टात आरोपपत्र दाखल - 21 सप्टेंबर 2013 - खटला सेशन्स कोर्टात वर्ग - 10 ऑक्टोबर 2013 - सेशन्स कोर्टात आरोप निश्चित - 14 ऑक्टोबर 2013 - खटल्याच्या कामकाजाला सुरुवात - 13 मार्च ते 15 मार्च 2014 या कालावधीत दोन्ही बाजूंनी अंतिम युुक्तिवाद - सरकारी पक्षातर्फे 44 साक्षीदारांची तपासणी - आरोपींच्या वतीने 3 साक्षीदारांची तपासणी - 21 मार्च 2014 - सेशन्स कोर्टानं चारही आरोपींना ठरवलं दोषी