जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / वाळू माफियांचा हैदोस, कोपर रेल्वे रूळ 'गिळण्याची' भीती

वाळू माफियांचा हैदोस, कोपर रेल्वे रूळ 'गिळण्याची' भीती

वाळू माफियांचा हैदोस, कोपर रेल्वे रूळ 'गिळण्याची' भीती

02 जुलै : ठाण्याजवळच्या मुंब्रा आणि कोपर खाडीत वाळूमाफियांनी हैदोस घातलाय. सक्शन पंपाद्वारे खाडीत रेती उपसा करण्यास कायद्याने बंदी आहे. मात्र हा बंदी आदेश धुडकावून लावत, रेती उपसा सुरूच आहे. हा वाळूचा उपसा आता कोपर रेल्वे स्टेशनजवळ येऊन पोचलाय. रेती माफियांना वेळीच आवर न घातल्यास रेल्वे रूळ खचून मध्य रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची भिती आहे. जाहिरात उल्हासनगर अंबरनाथदरम्यान रेल्वे रूळाशेजारील मातीचा भराव खचल्याने 15 फुटी खड्डा पडल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

    kopar thane 02 जुलै : ठाण्याजवळच्या मुंब्रा आणि कोपर खाडीत वाळूमाफियांनी हैदोस घातलाय. सक्शन पंपाद्वारे खाडीत रेती उपसा करण्यास कायद्याने बंदी आहे. मात्र हा बंदी आदेश धुडकावून लावत, रेती उपसा सुरूच आहे. हा वाळूचा उपसा आता कोपर रेल्वे स्टेशनजवळ येऊन पोचलाय. रेती माफियांना वेळीच आवर न घातल्यास रेल्वे रूळ खचून मध्य रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची भिती आहे.

    जाहिरात

    उल्हासनगर अंबरनाथदरम्यान रेल्वे रूळाशेजारील मातीचा भराव खचल्याने 15 फुटी खड्डा पडल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.मुंब्रा, दिवा, कोपर,डोंबिवली व कल्याण परिसरात मोठागाव ठाकुर्ली येथील रेतीबंदर खाडी, कोपर खाडी आणि कल्याण खाडी आहे. सक्शन पंपाद्वारे खाडीतील रेती उपसा करण्यास कायद्याने बंदी आहे. मात्र, हा बंदी आदेश धुडकावून लावीत, रेती उपसा सुरूच आहे. तसंच मोठ मोठे ट्रो रल वापरले जात आहे. कोपर खाडीत परिसरात भयानक परिस्थिती पाहावयास मिळते.

    सततच्या रेती उपशामुळे कोपर खाडीचे पात्र ओसाड दिसू लागले आहे. रेती माफिया हळूहळू रेल्वे रूळापर्यंतच्या काही अंतरापर्यंत पोहचले आहेत. रेल्वे रूळाखालील माती भुसभुशीत होऊन रेल्वे रूळाखालचा भरावही वाहून जाईल की काय अशी स्थिती आहे. त्यामुळे उल्हासनगरपेक्षाही भयानक परिस्थिती ओढण्याची भिती आहे. तसंच तिवरांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाची कधीही भरून न निघणारी हानी होत आहे.

    लोकलमधून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाच्या नजरेस ही स्थिती भरते. मात्र, सरकारी यंत्रणेचे याकडे लक्ष गेलेले नाही ही आश्चर्याची बाब आहे. काही वेळा महसूल अधिकारी रेती माफिया विरोधात तोंडदेखत कारवाई केली जाते. कल्याण तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासन यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने रेती माफियांना रान मोकळे मिळाले आहे. पर्यावरण प्रेमींचा आवाजही क्षीण ठरत आहे. अनेक वर्षांपासून रेतीमाफियांवर अप्रत्यक्षपणे मेहेरनजर दाखवणारी महसूल यंत्रणेला आता तरी जाग येईल का असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

    जाहिरात

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात