07 जानेवारी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचे लक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे असतानाचा आता राजू शेट्टी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील जागांवर पाठिंबा मिळावा यासाठी राजू शेट्टी यांचे हे प्रयत्न आहेत त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. याच बैठकीला गोपीनाथ मुंडे आणि विनोद तावडे देखील हजर आहेत. लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रवादीविरोधात तगडे उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती, माढा संागली, हातकणंगले, कोल्हापूर, बुलढाणा, नांदेड ,उस्मानाबाद आणि सोलापूर या जागांवर स्वाभिमानीचे उमेदवार उभे राहणार आहेत. एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात आपला पवित्रा आणखी संघर्षाचा केला आहे. त्याचवेळी महायुतीत जाण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक सुरू आहे. राष्ट्रवादीविरोधात स्वाभिमानी लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार
- माढा - सदाभाऊ खोत
- हातकणंगले - राजू शेट्टी
- कोल्हापूर - भगवान काटे किंवा प्रा. जालिंदर पाटील
- बुलडाणा - रवीकांत तूपकर
- बारामती - ऍड. सतीश काकडे