04 एप्रिल : ‘मोदी हे विभाजनाच्या बळावर मोठे झाले आहेत’ अशी टीका इकॉनॉमिस्ट या प्रतिष्ठीत मासिकाने केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळेलं आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील, अशी अटकळ अनेक निवडणूकपूर्व पाहण्यांमधून दिसून येते. मात्र, याचा अर्थ सगळेच जण मोदींचं समर्थन करताहेत असा नाही. ‘मोदी हे मुस्लीमविरोधी’ असल्याचा आरोप इकॉनॉमिस्ट केला आहे. 2002च्या दंगलीनंतर मोदींनी माफी मागितलेली नाही, तसंच त्यांनी मुस्लीम पद्धतीची टोपी घालायलाही नकार दिला होता याकडे या मासिकानं लक्ष वेधलं आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या एसआयटीने मोदींना क्लिन चीट दिल्यावरही इकॉनॉमिस्टने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निवडणूक निकालानंतर राहुल गांधी पंतप्रधान होण्याची शक्यता कमी आहे, मात्र भारतीयांनी कमी त्रासदायक नेता निवडायला हवा अशी अपेक्षा इकॉनॉमिस्टनं व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.