जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मोदींची निवड समुद्रमंथनातून अमृत बाहेर येणं -उद्धव ठाकरे

मोदींची निवड समुद्रमंथनातून अमृत बाहेर येणं -उद्धव ठाकरे

मोदींची निवड समुद्रमंथनातून अमृत बाहेर येणं -उद्धव ठाकरे

13 सप्टेंबर : पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी नरेंद्र मोदी यांची निवड म्हणजे समुद्रमंथनातून अमृत बाहेर येणं आहे. देशातल्या जनतेचा मूड मोदींच्या बाजूने आहे. काँग्रेसच्या घोटाळेबाज, नेभळ्या सरकारचा मोदी पराभव करतील. हिंदुत्त्वाला उभारी देण्यासाठी मोदींचं खुल्या दिलानं स्वागत आहे अशा शब्दात शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. आज नरेंद्र मोदींच्या निवडीवरुन भाजपचे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरेंना फोन करुन मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून तुम्ही पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

    udhav on sharad pawar_2 13 सप्टेंबर : पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी नरेंद्र मोदी यांची निवड म्हणजे समुद्रमंथनातून अमृत बाहेर येणं आहे. देशातल्या जनतेचा मूड मोदींच्या बाजूने आहे. काँग्रेसच्या घोटाळेबाज, नेभळ्या सरकारचा मोदी पराभव करतील. हिंदुत्त्वाला उभारी देण्यासाठी मोदींचं खुल्या दिलानं स्वागत आहे अशा शब्दात शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. आज नरेंद्र मोदींच्या निवडीवरुन भाजपचे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरेंना फोन करुन मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून तुम्ही पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती. राजनाथ सिंह यांच्या मागणीच्या अगोदरच शिवसेनेनं मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. गुरूवारी रात्री उद्धव ठाकरे आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान फोनवरुन चर्चा झाली होती. यावेळी शिवसेनेनं मोदींना पाठिंबा दिला होता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात