02 मे : मोदींनी प्रियांका केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या गदारोळ ताजा असतानाच मोदींनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना आपले ‘चांगले मित्र’ म्हटले असल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे. मात्र मोदींचं ‘मी त्यांचा चांगला मित्र’ असल्याचं वक्तव्य हे हास्यास्पद आणि निराधार’ असल्याचं अहमद पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.
याप्रकरणी अहमद पटेल यांनी ‘मी मोदींना फक्त एकदा 80च्या दशकात भेटलो होतो आणि माझ्या नेत्यांना त्याविषयी माहिती आहे. मी त्यांच्याकडून कधीही व्यावसायिक किंवा वैयक्तिक लाभाची अपेक्षा केली नाही. तसं कोणी सिद्ध केल्यास मी सार्वजनिक आयुष्यातून निवृत्त होईन.’ असं सांगत पटेल यांनी असं काहीही नसल्याचे स्पष्ट केले आहे.
‘अहमदभाई काँग्रेसमधील माझ्या सर्वात चांगल्या मित्रांपैकी होते. मी बरेचं वर्ष त्यांना ‘बाबू भाई’ असं बोलायचो, पण इतरांन समोर त्यांना आदराने ‘मियान’ असाचं उल्लेख करायचो.’ असं मोदींनी या दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीतून हाही भाग काढून टाकल्याचा आरोप भाजपनं केला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++