जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मुंबई गँगरेप प्रकरणी आरोपपत्र दाखल

मुंबई गँगरेप प्रकरणी आरोपपत्र दाखल

मुंबई गँगरेप प्रकरणी आरोपपत्र दाखल

19 सप्टेंबर : मुंबईत छायाचित्रकार तरूणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी आज आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. चारही आरोपींना मॅजिस्ट्रेट कोर्टात आज आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. कासीम बंगाली, सलीम, सीराज रेहमान, जाधव असं या आरोपींची नावं आहेत. आरोपपत्र सहाशे पानांचं आहे. तर एका अल्पवयीन आरोपीवर ज्युनाईल कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. याप्रकरणातील तीन आरोपी आणि अपशपाक आणि गोट्या अशा पाच आरोपींनी यापूर्वी 31 जुलै रोजी एका तरुणीवर देखील बलात्कार केला होता. त्याप्रकरणी 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    mumbai gang rape3 3 19 सप्टेंबर : मुंबईत छायाचित्रकार तरूणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी आज आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. चारही आरोपींना मॅजिस्ट्रेट कोर्टात आज आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. कासीम बंगाली, सलीम, सीराज रेहमान, जाधव असं या आरोपींची नावं आहेत. आरोपपत्र सहाशे पानांचं आहे. तर एका अल्पवयीन आरोपीवर ज्युनाईल कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. याप्रकरणातील तीन आरोपी आणि अपशपाक आणि गोट्या अशा पाच आरोपींनी यापूर्वी 31 जुलै रोजी एका तरुणीवर देखील बलात्कार केला होता. त्याप्रकरणी 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मागिल महिन्यात 22 ऑगस्ट रोजी महालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये एक छायाचित्रकार तरूणी आपल्या सहकार्‍यासह फोटोशूट करण्यासाठी गेली होती. यावेळी पाच नराधमांनी या दोघांना अडवले. आणि तिच्या सहकार्‍याला मारहाण करून पीडित तरूणीवर दोघांनी अत्याचार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तीनच दिवसात पाचही आरोपींनी अटक केली. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालं. त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. आरोपींविरोधात पोलिसांनी डीएनए चाचणी घेतलीय. तसंच घटनास्थळी आरोपींना नेऊन जबाबही नोंदवण्यात आलाय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात