जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मी स्वत:हून बोलणार नाही, उद्धव ठाकरेंचा पवित्रा

मी स्वत:हून बोलणार नाही, उद्धव ठाकरेंचा पवित्रा

मी स्वत:हून बोलणार नाही, उद्धव ठाकरेंचा पवित्रा

19 ऑक्टोबर : मला कुणी एकटं पाडू शकत नाही. त्यांना जर राष्ट्रवादीने प्रस्ताव दिला आहे तर त्यांनी सोबत जावं पण मला अजून असा कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे मी पुढे होऊन बोलणार नाही. मी माझ्या घरी आहे असं सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतलीये. निकालानंतर उद्धव यांनी पत्रकार परिषद घेऊन निकालावर समाधान व्यक्त केलं आणि विजय शिवसैनिकांना अर्पण केला. मात्र शिवसेनेकडून भाजपला फोन करण्यात आला होता अशी माहिती सूत्रांनी दिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

    udhav mahalkxmi sabbha33 19 ऑक्टोबर : मला कुणी एकटं पाडू शकत नाही. त्यांना जर राष्ट्रवादीने प्रस्ताव दिला आहे तर त्यांनी सोबत जावं पण मला अजून असा कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे मी पुढे होऊन बोलणार नाही. मी माझ्या घरी आहे असं सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतलीये. निकालानंतर उद्धव यांनी पत्रकार परिषद घेऊन निकालावर समाधान व्यक्त केलं आणि विजय शिवसैनिकांना अर्पण केला. मात्र शिवसेनेकडून भाजपला फोन करण्यात आला होता अशी माहिती सूत्रांनी दिली.

    जाहिरात

    यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरली सर्वच पक्ष स्वबळावर मैदानात उतरल्यामुळे निकालही अपेक्षेप्रमाणेच लागला. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. भाजपने आजपर्यंत सर्वाधिक जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. भाजप आणि घटकपक्षांनी 122 जागा जिंकल्यात. पण बहुमताचा 145 जागांचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने आपला पत्ता टाकत भाजपला कोणतीही अट न टाकता पाठिंबा दिला. संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. कोण कुणाकडे जात आहे ते मला माहिती नाही. पण अखंड महाराष्ट्राचा विकास करणार्‍याला आमचा पाठिंबा राहिल. पण मला अजून तरी कुणी विचारलं नाही. कुणाचा निरोप आला नाही. त्यामुळे मी स्वत:हून भाजपशी बोलणार नाही. मलाही तसा कुणाचा निरोप आला नाही त्यामुळे मी जरी त्यांच्याकडे प्रस्ताव दिला तर त्यांनी नाकारला तर काय करणार ? अगोदरच राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे त्यांना मान्य असेल तर भाजपने जावं. पण मी स्वत:हून चर्चा करणार नाही मी माझ्या घरीच आहे. जोपर्यंत कुणी येत नाही तोपर्यंत मी समोर जाणार नाही असा पवित्रा उद्धव यांनी घेतलाय. आमच्यासमोर अजूनही पर्याय खुले आहे असंही ते सांगण्यास विसरले नाही. आम्ही एकाकी लढलो जो काही विजय मिळाला आहे तो शिवसैनिकांमुळे मिळाला आहे. शिवसैनिकांचे आभार हीच माझी ताकद आहे. आम्ही दादर जिंकलंय. आणि शिवसेनाप्रमुखांना त्रास देणार्‍यांना धडा शिकवला असं सांगत त्यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात