29 जानेवारी : माळीण दुर्घटनेला 30 जानेवारीला म्हणजे उद्या 6 महिने पूर्ण होत आहे. पण, माळीण च्या परिसरातून जाणार्या रस्त्याचे काम सुरू असताना मानवी शरीरातील हाडं व कवट्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील भीमशंकरजवळ आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर डोंगरकडा कोसळल्यामुळे अखं गाव गाडलं गेलं. या दुर्घटनेत 151 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला आता सहा महिने पूर्ण होत आहे. पण यामध्ये सुखरूप वाचलेल्या गावकर्यांच्या वेदना मात्र कमी होताना दिसत नाहीत. ज्या दिवशीही घटना घडली त्यादिवसापासून ढिगार्याखाली गाडल्या गेलेल्या नागरिकांची शोध मोहीम तब्बल 6 दिवस सुरू होती, मात्र प्रशासनाला 151 पैकी 146 मृतदेहांचेच पूर्ण अवशेष सापडले होते. 6 मृतदेहांचे सगळे अवयव सापडले नव्हते आणि आता दोन दिवसांपूर्वी आणखी काही अवशषे सापडले आहेत. या परिसरातून जाणार्या रस्त्याचे काम सुरू असताना मानवी शरीरातील हाडं व कवट्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माळीण दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. गावकर्यांच्या मागणीला प्रशासनाने दाद न दिल्याने काही मृतदेह सापडलेच नव्हते. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++