जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / महामार्गावर कंत्राटदाराला सुरक्षेच्या उपाययोजना देणे ठरणार बंधनकारक !

महामार्गावर कंत्राटदाराला सुरक्षेच्या उपाययोजना देणे ठरणार बंधनकारक !

महामार्गावर कंत्राटदाराला सुरक्षेच्या उपाययोजना देणे ठरणार बंधनकारक !

09 जून : महामार्गांवर भविष्यात रस्त्यांच्या कामाचं कंत्राट देताना सुरक्षेच्या उपाययोजना करणे बंधनकारक ठरणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज (गुरुवारी) सततच्या होणार्‍या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मुंबई -पुणे एक्स्प्रेसवेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रस्ता सुरक्षा परिषदेच्या अधिकारात एक्स्प्रेस वेवरची गस्त वाढवली आहे. रात्री आणि दिवसा 29 टीम्स गस्त घालणार, तसंच 6 महिन्यांत कॅमेरे, स्पीडगन्स, कंट्रोल रुम्सची व्यवस्थाही करणार असल्याचं सांगण्यात आलंय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    09 जून : महामार्गांवर भविष्यात रस्त्यांच्या कामाचं कंत्राट देताना सुरक्षेच्या उपाययोजना करणे बंधनकारक ठरणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

    mumbai_express3 सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज (गुरुवारी) सततच्या होणार्‍या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मुंबई -पुणे एक्स्प्रेसवेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रस्ता सुरक्षा परिषदेच्या अधिकारात एक्स्प्रेस वेवरची गस्त वाढवली आहे.

    रात्री आणि दिवसा 29 टीम्स गस्त घालणार, तसंच 6 महिन्यांत कॅमेरे, स्पीडगन्स, कंट्रोल रुम्सची व्यवस्थाही करणार असल्याचं सांगण्यात आलंय. भविष्यात रस्त्यांच्या कामाचं कंत्राट देताना सुरक्षेच्या उपाययोजना करण बंधनकारक ठरणार आहे. तसंच अवजड वाहनाना दंडापायी दुप्पट रक्कम मोजावी लागणार आहे. याची अंमलबजावणी लवकरच होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

    जाहिरात

    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात