जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / भूकंपानंतर नेपाळवर आता पावसाचा कहर

भूकंपानंतर नेपाळवर आता पावसाचा कहर

भूकंपानंतर नेपाळवर आता पावसाचा कहर

26 एप्रिल : नेपाळमध्ये आलेल्या महाविनाशकारी भूकंपानंतर आता पावसाने तांडव सुरू केलंय. नेपाळमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालीये. येत्या 72 तासांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलीये. त्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झालाय. महाभूकंपाने नेपाळला मोठा हादरा बसलाय. नेपाळची राजधानी काठमांडूत इमारती जमीनदोस्त झाल्यात, तर कुठे रस्ते उखडले गेले आहे. मृतांचा आकडा 2400 वर पोहचलाय. मृतदेहांचा खच्च पडलाय. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळत चाललीये. देशभरातून मदतकार्य सुरू आहे. भारतानेही मदतकार्य सुरू केलं असून ऑपरेशन मैत्री असं नाव देण्यात आलंय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    nepal_26april3 26 एप्रिल : नेपाळमध्ये आलेल्या महाविनाशकारी भूकंपानंतर आता पावसाने तांडव सुरू केलंय. नेपाळमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालीये. येत्या 72 तासांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलीये. त्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झालाय. महाभूकंपाने नेपाळला मोठा हादरा बसलाय. नेपाळची राजधानी काठमांडूत इमारती जमीनदोस्त झाल्यात, तर कुठे रस्ते उखडले गेले आहे. मृतांचा आकडा 2400 वर पोहचलाय. मृतदेहांचा खच्च पडलाय. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळत चाललीये. देशभरातून मदतकार्य सुरू आहे. भारतानेही मदतकार्य सुरू केलं असून ऑपरेशन मैत्री असं नाव देण्यात आलंय. पण, पावसाला सुरूवात झाल्यामुळे बचावकार्याला फटका बसलाय. भारतातून नेपाळकडे बचावकार्यासाठी रवाना झालेली हवाई दलाची विमानं परतली आहेत. भारताने आर्मी हॉस्पिटल्सचं साहित्य, इंजीनिअरिंग टीम्स, जीवनावश्यक वस्तू असं घेऊन जाणारी हवाई दलाची 10 विमानं आज पाठवण्यात आली. तसंच एनडीआरएफच्या काही टीम्सही काठमांडूत पोहोचल्यात. एम आय 17 जातीची 8 हेलिकॉप्टर्स, आणि चार इतर हेलिकॉप्टर्स नेपाळला पाठवण्यात आली आहेत. एअर इंडिया, स्पाईसजेट, इंडिगो एअरलाईन्सनी काठमांडूकडे अतिरिक्त विमानांची सोय केली आहे. बचावासाठीचं साहित्य प्राधान्यानं पाठवण्यावर एअर इंडियाचा भर आहे. भारतीय रेल्वेकडून पाण्याच्या 1 लाख बाटल्या पाठवण्यात आल्यात. एअरटेल आणि बीएसएनएल या कंपन्यांनी नेपाळमधले कॉल रेट्स कमी केले आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून 15 टन औषधांसह 34 जणांचं वैद्यकीय पथकंही रवाना झालयं. मृतांची संख्या 2,400 वर नेपाळमधल्या भूकंपामध्ये मृत्युमुखी पडलेल्या बळींची संख्या 2400 वर पोहोचलीय. तर सुमारे 5000 लोक जखमी झालेत. आजही इथले स्थानिक उघड्यावर रात्र काढणार आहेत. ही आपत्ती नैसर्गिक आपत्ती असल्याचं सरकारने जाहीर केलंय. इथे सुरू झालेल्या पावसानं ही परिस्थिती अधिक कठीण झालीय. नेपाळमधल्या शाळा आणि कॉलेज आठवडाभर बंद राहणार आहेत. आजही दुपारी नेपाळमध्ये पुन्हा भूकंप झाला. काठमांडूपासून सुमारे 110 किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्र होतं. नेपाळला कालपासून आजपर्यंत 48 भूकंपाचे धक्के बसले.

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात